जागर न्यूज : जिल्हाधिकारी कार्यालयातून जमीन विक्रीस परवानगी मिळवून देतो म्हणत लाच मागणाऱ्या दोघांच्या मुसक्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवळल्या असून यात एक अव्वल कारकून तर दुसरा लिपिक आहे.
पोलीस आणि महसूल विभाग लाचखोरीत सतत चर्चेत असून अनेक अधिकारी, कर्मचारी तुरुंगात जात असले तरी लाचेचा मोह काही सुटताना दिसत नाही. शासकीय कामासाठी जनतेला वेठीस धरण्यात येत असते आणि लाच दिली की लगेच न होणारे काम देखील सहज होत असते असा अनुभव विविध शासकीय कार्यालयात येतो. आता पुन्हा एकदा दोन लाच खोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. वतन म्हणून मिळालेली जमीन विक्री करण्याची परवानगी मिळवून देतो, असे सांगून तक्रारदारांकडून दीड लाखाची लाच घेणाऱ्या या दोघांना एसीबीच्या पथकाने जेरबंद केले त्यामुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. कूळ वहिवाट शाखेतील अव्वल कारकून अनंता विठ्ठलराव भानुसे (वय ५१, रा. विजयनगर, सांगली), लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर दिलीप निवृत्ती देसाई (रा. ढवळी, ता. तासगाव) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी कारवाई केली.
तक्रारदार व खरेदी करणार यांनी वतन जमीन विक्री करण्याची परवानगी मिळण्याबाबत सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज केला होता. कूळ वहिवाट शाखेतील अव्वल कारकून अनंता लाच प्रकरणी ताब्यात घेतलेले संशयीत भानुसे याने हे काम वरिष्ठांना सांगून करून देण्यासाठी २ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर दीड लाखावर हा व्यवहार ठरला. तक्रारदारांनी १९ जानेवारी, २०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक सांगली विभागाचा पदभार असलेले पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांची भेट घेऊन तक्रार अर्ज केला. त्यानंतर २५ व ३० जानेवारी रोजी पोलिसांनी साक्षीदारांना सोबत घेऊन कारकून भानुसे लाच मागत असल्याची खात्री करून केली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कॅन्टीनजवळ सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून दीड लाखाची लाच स्वीकारल्यानंतर अनंता भानुसे यास अटक केली. त्यानंतर लाच देण्यास प्रोत्साहन केल्याबद्दल लिपिक दिलीप देसाई यालाही जेरबंद केले. दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या कारवाईत उपअधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अंमलदार धनंजय खाडे, अजित पाटील, प्रीतम चौगुले, सीमा माने, (Two revenue department employees in the trap in bribery case)सलीम मकानदार, रवींद्र धुमाळ, ऋषीकेश बडनीकर, अतुल मोरे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, राधिका माने, अनिस वंटमुरे यांनी सहभाग घेतला. या कारवाईने महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा