जागर न्यूज :अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री. क्षेत्र पंढरपूर येथे उद्या बुधवारी माघी यात्रा भरत असून गेल्या चार दिवसांपासून विठ्ठलाची पंढरी गजबजून गेली आहे
पंढरीच्या चार प्रमुख वाऱ्यापैकी माघ वारी ही एक वारी असते आणि या वारीसाठी महाराष्ट्रातून भाविक पंढरीत येत असतात. उद्या माघ एकादशी असल्यामुळे गेल्या चार पाच दिवसांपासून भाविकांची वर्दळ पंढरीच्या रस्त्यावर दिसत आहे. अवघी पंढरी गजबजून गेली असून चंद्रभागेच्या वाळवंटात देखील चैतन्य फुलून आले आहे. मोठ्या भक्तिभावाने भाविक माघी यात्रेचा भक्ती उत्सव साजरा करीत असून प्रशासनाने देखील भाविकांच्या सुविधेसाठी सर्व उपाय योजना केल्या आहेत. चंद्रभागेचे वाळवंट दोनवेळा स्वच्छ करणेत आले आहे. तसेच उघड्यावर शौचास बसु नये म्हणुन पुतळा ते महाद्वार, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, विशेष टीम नेमण्यात आली आहे. तसेच नदी पात्र, पत्राशेड दर्शनबारी ६५ एकर, मंदिर अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहिम हाती परिसरात व शहरात आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन २४ तास अग्रिशमन वाहन उभे करण्यात आले आहे. पत्रा शेड, नविन अग्निशमन केंद्र, चंद्रभागा नदी वाळवंट तसेच मंदीरा भोवती आग लागल्यास अग्निशमन वाहनास त्वरीत पाणी उपलब्ध व्हावे म्हणुन मंदीराच्या दक्षिण बाजुस फायर हायड्रेट उभा केला आहे.
भाविकांसाठी यात्रा कालावधीमध्ये मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गोपाळपूर रोड दर्शन बारी पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध करून दिले आहे. या ठिकाणी आतील बाजूस शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एकुण ६५ हातपंप व मंदिर परिसरातील विद्युत पंपाद्वारे यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत पिण्याचे पाणी किमान १० टँकर द्वारे संपूर्ण शहरात विशेष: ज्या ठिकाणी मठांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी पाणी पुरविण्यात येणार आहे. यात्रा कालावधीत शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असुन यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता रहावी म्हणुन नियोजन बद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. (Crowd of devotees in Pandhari for Maghi Yatra, administration is ready)नगरपरिषदेच्यावतीने ११०० सफाई कर्मचाऱ्याद्वारे स्वच्छता केली आहे.
नगरपरिषदेने स्टेशन रोड, प्रदक्षिणा रस्त्याचे व शहरातील इतर रस्ता दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. तसेच अर्बन बँक ते नाथ चौक, सावरकर अंबाबाई पटांगण, चंद्रभागा वाळवंट येथील घेण्यात आली असून पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण काढण्याचे काम चालु आहे. तसेच वाळवंटात येणा-या यात्रेकरूंना वाहनांची वाहतुकीची सोय व्हावी म्हणुन जुना पुल ते पुंडलिक मंदीर व या मुख्य रस्त्याला लागुन नदीपर्यंत उपरस्त्याची आखणी करण्यात आली आहे. तसेच पुंडलिक मंदीर ते दगडी पुलापर्यंत ९ हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर २०० वॅट एलईडी दिवे लावण्यात आले असुन सदर दिव्यांचा प्रकाश संपूर्ण वाळवंटात पडणार आहे. यात्रेकरूंच्या सोईसाठी संपुर्ण दर्शन बारी मार्ग, ६५ एकर मध्ये १६० एलईडी दिवे व ६ हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच ६५ एकर मध्ये असलेल्या १८०० शौचालयामध्ये विजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनिल नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन स्वतंत्र पाईप लाईन द्वारे यात्रेकरूंना पिण्याचे पाणी मिळावे या हेतुन नदीच्या वाळवंटामध्ये ४५ नळ बसविण्यात आले आहेत. तसेच वाळवंटात विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा