जागर न्यूज : जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराने पुन्हा दुसऱ्या पत्नीवरही प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपातून पंढरपूर तालुक्यातील एकाला मोठ्या दंडासह पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील आरोपी धोंडीराम भिमराव शेळके याने त्याची पहिली पत्नी छबबाबाई हिचा खुन केला होता. त्यामध्ये दसरी पत्नी रजना हिने साक्ष दिल्यामुळे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याचा राग मनात धरून रंजना हिचेवर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रवत्न केल्याप्रकरणी आरोपीस भादवि ३०७, ५०४, ५०६ करीता दोषी धरून भादवि ३०७ करीता ५ वर्ष सक्तमजुरी बव ५८ हजार रूपये दंड व भादवि ५०४ करीता १ हजार रूपये दंड, भादंवि ५०६ करीता २ हजार रूपये दंडाची शिक्षा पंढरपूर येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश २ न्या. एम बी लंबे यांनी सुनावली. यातील आरोपी धोंडीराम यास त्याने त्याची पत्नी छबाबाई हिचा दिनांक १६ जुलै २००१ रोजी खुन केलेला होता व त्या प्रकरणात त्याची दुसरी पत्नी रंजना हिने आरोपीविरूध्द साक्ष दिलेली होती. त्यामुळे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झालेली होती. ती शिक्षा भोगुन आरोपी येरवडा जेलमधुन सुटलेला होता व ३ महिन्यापासुन तिसंगी येथे मुलाकडे राहणेस होता. परंतु रंजना हिने साक्ष दिल्यामुळे त्याला १४ वर्षाची शिक्षा झाली होती याचा राग मनात होता व तो रंजना हिला तुझ्यामुळे मला १४ वर्ष जेलमध्ये बसावे लागले असे म्हणत होता.
दिनांक १९ मार्च २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता रंजना ही घरात असताना आरोपीने उसतोडीच्या कोयत्याने तिला जिवे मारण्याचे उददेशाने तिचे डोक्यावर, डोळयाजवळ, डोक्याच्या पाठीमागे वार करून तिला गंभीर जखमी केले व कोयता घेवुन पळून गेला याबाबत फिर्यादी सत्यवान शेळके यांनी आरोपीविरूध्द पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली होती. त्याप्रमाणे आरोपीविरूध्द भारतीय दंड संहिता कलम ३०७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. यात तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुखदेव गोदे व उपविभागीय पोलीस अधिकारी विकम कदम यांनी दोषारोपपत्र दाखल केलेले होते. यात सरकारपक्षातर्फे एकुण ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये फिर्यादी सत्यवान शेळके, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शरद महादेव पवार, डॉ. बजरंग कृष्णा धोत्रे, डॉ. समीर कुलकर्णी, मपोह मोनिका वाघे तसेच पंच साक्षीदार दशरथ माळी, अमर वाघमोडे, राजेंद्र ढाणे तसेच जखमी रंजना शेळके यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या.
आरोपीतर्फे झालेली घटना खोटी असून आरोपीस त्याची मुले व पत्नी रंजना सांभाळत नव्हती या कारणावरून गावात बदनामी होत होती. त्याला सांभाळु लागु नये म्हणुन खोटी फिर्याद दाखल करून खोटया गुन्हयात गुंतविले होते. तसेच फिर्याद दाखल करण्यास विलंब झालेला आहे असा बचाव घेण्यात आल्ग. परतु, सरकारपक्षातर्फे सदर गुन्हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीवर असुन यामध्ये फिर्यादी सत्यवान शेळके व त्रयस्थ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शरद पवार, जखमी रंजना तसेच वैदयकीय अधिकारी डॉ. धोत्रे व डॉ. कुलकर्णी तसेच इतर साक्षीदार यांच्या साक्षी महत्वपुर्ण आहेत. तसेच जखमी रंजना हिचा तोंडी पुरावा व वैदयकीय पुरावा एकमेकांशी सुसगत आहे. त्यामुळे आरोपीस अशा केसमध्ये गुंतविण्याचे कारण नाही या सगळया परिस्थीती व सर्व साक्षीदारानी एकमेकाना पुरक अशी साक्ष दिलेली आहे असा युक्तिवाद सरकारपक्षातर्फे सरकार पक्षातर्फे करण्यात आला.
एकंदरीत पुरावा व दोषारोपपत्रातील कागदपत्रे याचे अवलोकन करून आरोपीस भादवि ३०७, ५०४, ५०६ करीता दोषी धरून भादवि ३०७ करीता ५ वर्ष सक्तमजुरी व ५,०००/-हजार रूपये दंड व भादवि ५०४ करीता १ हजार रूपये दंड, भादवि ५०६ करीता २ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या असून गुन्हयात आरोपी अटक असून त्यास जामीन मिळालेला नाही. (Re-sentence and heavy fine to offender sentenced to life imprisonment) त्यामुळे अटक मुदतीतील कालावधी शिक्षेत वजा करण्यात येईल तसेच दंडापैकी ८ हजार रूपये रक्कम जखमी रंजना हिस नुकसानभरपाई म्हणुन देण्यात येईल अशी शिक्षा सुनावली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा