जागर न्यूज : भाविकांच्या विठ्ठल भक्तीचा आणखी एक महिमा समोर आला असून एका माऊलीने शेळ्या मेंढ्या राखून आणि आपल्या जवळचे सोने मोडून विठूमाऊलीला एका लाख अकरा हजार रुपयांची देणगी दिली आहे.
पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी भाविक रोज आपल्या परीने देणग्या देत असतात. विठूमाउलीच्या भक्तात गरीब, सामान्य आणि कष्टकरी भाविकांची संख्याच अधिक असते पण त्यांच्यातील भक्ती आणि श्रद्धा प्रचंड मोठी असते. अलीकडेच केरसुणी विकणाऱ्या एका महिलेनेही दिलेली देणगी मोठ्या चर्चेत आली होती तर आता सांगोला तालुक्यातील एका माउलीने दिलेली देणगी भक्तीचा महिमा सांगणारी ठरली आहे. पाच वर्षे कष्ट करून पैसा पैसा साठवला आणि सोने मोडून विठूमाउलीच्या चरणी एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी देण्याचे मोठे मन दाखवले. भक्तीच्या शक्तीला तोड नाहीच हेच पुन्हा एकदा या घटनेने दाखवून दिले आहे.
सांगोला तालुक्यातील फुलाबाई चव्हाण या आजीबाईनी कष्ट करून एक एक रुपया जमवला आणि देवाच्या चरणी अर्पण केला. आज त्यांनी जवळचे दीड तोळे सोन्याचे दागिने मोडून आणलेले ८० हजार आणि जवळचे ३१ हजार रुपये असे एकूण १ लाख ११ हजार रुपयांची देणगी त्यांनी विठुरायाच्या चरणी अर्पण केलीय. फुलाबाई चव्हाण यांच्या या भक्तीला आणि श्रद्धेला खरोखरच तोड नाही. एकीकडं लाखो रुपये असताना काही जण दान करायला मागे-पुढं पाहतात. अशावेळी घरी काही नसताना कष्ट करून पैसे जमा केले. ते विठ्ठलाच्य चरणी अर्पण केले. शेतात काबाड कष्ट करून व शेळ्या मेंढ्या विकून पै-पै जमा केला. त्यांचं वय ७० वर्षे आहे. या आजीने विठुरायाला तब्बल एक लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली आहे.
फुलाबाई विष्णू चव्हाण या सांगोला तालुक्यातील शिवणे येथे त्या आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. फुलाबाई यांची विठुरायावर अपार श्रद्धा आहे. त्यांना अनेक वर्षांपासून विठ्ठलाला देणगी देण्याची इच्छा होती. तसा मनोदय त्यांनी आपल्या मुलांजवळ बोलूनही दाखवला होता. पण देणगीसाठी कोणाकडे पैसे मागणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. (After working hard, the old man donated to Vitthala) गेल्या पाच वर्षांत त्यांनी रानामाळात शेळ्या मेंढ्या राखून पै पै जमा केले. जवळचे सोने मोडले आणि आलेली रक्कम त्यांनी आज विठूमाउलीच्या चरणी अर्पण केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा