जागर न्यूज : निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रामाणिक नागरिक पैसे घेत नाहीत म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षाकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करीत मतदारच रस्त्यावर उतरले असल्याची एक वेगळी घटना पुण्यात समोर आली आहे.
पुण्यात कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आज मतदानाला सुरुवात देखील झाली आहे पण एक वेगळाच विषय मोठ्या चर्चेचा बनला आहे. पुण्यातील गंजपेठ भागात पैसे घेतले नाही म्हणून भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गंजपेठ भागातील गंजपेठ भागात भाजपचे माजी नगरसेवक विष्णू अप्पा हरिहर यांनी नागरिकांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुपारच्या दरम्यान पैसे वाटत असताना हरिहर यांना स्थानिकांनी हटकले होते. त्यामुळे बदला घेण्याच्या भावनेने रात्री २५ ते ३० लोक घेऊन गंजपेठ ६३० येथे राहणाऱ्या लोकांना शिवीगाळ करत मारहाण केली. अशी माहिती तिथे राहणाऱ्या नागरिकांनी आणि काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांनी दिली. रमेश बागवे यांच्या सांगण्यानुसार, या प्रकरणी पोलिसात तक्रार देऊन पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.
कसबा या भागामध्ये पैसे वाटण्यास विरोध केल्या प्रकरणी भाजपचे नागरसेवक व त्यांच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली आहे. आमच्या महिला भगिनीला लाथा-बुक्काने मारहाण केली आहे. हा प्रकार निंदनीय आहे. त्यासोबत जातीवाचक शिव्या दिल्या आहेत. तुम्हाला हिते राहण्याचा अधिकार नाही अश्या धमक्या दिल्या आहेत. या बाबत पोलीस ठाण्यात आम्ही तक्रार दिली आहे, आणि वरिष्ठ अधिकारी गुन्हा दाखल करण्याच काम करत आहे, अशी माहिती रमेश बागवे यांनी दिली.दरम्यान, गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिकांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या धरला होता. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाा आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहे. भाजपकडून मोठ्या प्रमाणात निवडणुकीत मतदारांना पैशाचे वाटप करण्यात आले आणि हे वाटप पोलिसांच्या मदतीने करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे आणि याप्रकरणी त्यांनी उपोषण देखील केले होते.
निवडणुकीत पैशाचा खेळ कसा चालतो हे आता सर्वसामान्य मतदारांनाही माहित आहे. काही प्रामाणिक मतदार पैसे घ्यायला नकार देतात. काही रुपयात स्वत:ला न विकणारे अनेक मतदार असतात पण त्यांना पैसे घेतले नाही म्हणून मारहाण केल्याची घटना यापूर्वी कधी घडली नाही. पुण्यात मात्र हा ऐतिहासिक प्रकार समोर आला असून भारतीय जनता पार्टीने पराभव दिसताच मोठ्या प्रमाणात पैसा वाटला असल्याचे आरोप मतदानाच्या आधीच झाले आहेत. (Pune assembly by-election, money game, people on streets)आता मात्र पैसे घेतले नाहीत म्हणून मतदारांना मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आल्याने निवडणुकीतील पैशाचा खेळ पुन्हा एकदा समोर आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा