जागर न्यूज : पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील मोठ्या चोरींचा छडा लागला असून सहा चोरट्यांना जेरबंद करण्यात मंगळवेढा पोलिसांना मोठे यश आले आहे. दोन लाखांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, मोहोळ अशा विविध भागात चोरट्यांचा धुमाकूळ असून घरफोडी तर केली जातेच पण भर रस्त्यावर देखील लुटमार केली जाते. यामुळे नागरिकांच्या मनात चोरांची भीती असतानाच पंढरपूर तालुक्यातील एका मोठ्या चोरीसह अन्य काही चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पंढरपूर तालुक्यातील भर रस्त्यावर दुचाकीला लाथ मारून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बॅग हिसकावून घेत मोठ्या रकमेची चोरी केली होती. या घटनेने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली होती आणि चोरांची दहशत देखील निर्माण झाली होती परंतु या चोरीचा देखील तपास लागला असून सदर चोरांनी हा गुन्हा कबूल केला आहे. यासह आणखी काही चोऱ्या उघडकीस आलेल्या आहेत.
वेगवेगळ्या पाच चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यास मंगळवेढा पोलिसांना यश आले. यामध्ये सहा जनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार गुन्हयातील 1 लाख 90 हजाराचा हजाराचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला. पहिल्या घटनेतील फिर्यादी बैजनाथ जनार्दन शिंदे भारत फायनान्सच्या लोन ऑफिसरने भोसे परिसरातून वसुलीची रक्कम घेवुन मंगळवेढ्यास येत असताना शहरानजीक पाठीमागुन युनिकॉर्न गाडीवरुन तीन अनोळखी इसमांनी चाकुचा धाक दाखवुन 45 हजार 336 रुपये रोख व एक टॅब, बायोमेर्टीक मशीनसह बॅग हिसकावुन पळुन गेले. या प्रकरणात तीन संशयीतानी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडुन 25 हजार रुपये रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली 75 हजार किंमतीची युनिकॉर्न दुचाकी जप्त करण्यात आली.
दुसऱ्या घटनेतील फिर्यादी महादेव चिंतु लेंडवे, रा. लेंडवे चिंचाळे हा जेवण करून झोपला असता दोन इसमांनी हातात कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांच्या खिशातील मोबाईल व पैसे जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीच्या पत्नीच्या गळयातील २० हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्रातील मनी जबरीने चोरी केली. या प्रकरणात एका संशयीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचेकडुन 3 ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी जप्त करण्यात आले.
तिसऱ्या घटनेतील पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ते पंढरपुर रोडवर सातारा नाक्याजवळ मोटारसाकलवर आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी फिर्यादीच्या मोटारसायकला लाथ मारून फिर्यादीकडील बॅग हिसकावुन रक्कम रुपये 1 लाख 68 हजार 240 रू रोख रक्कम, एक टॅब चोरुन नेला. पहिल्या घटनेतील आरोपीकडे अधिक तपास केला असता, पंढरपुर ग्रामीण हददीमधील जबरी चोरी केल्याची कबुली दिली. तर चौथ्या घटनेत फिर्यादी मयुर महादेव पाटील, रा. डोंगरगाव, ता. मंगळवेढा याची पंढरपुर रोडवरील सम्राट मोटार या दुकानासमोर लावलेली ज्युपिटर मोटारसाकल एमएच 13 सीई 5388 च्या डिक्कीमध्ये ठेवलेली 1 लाखाच्या चोरी प्रकरणी संशयीत तिन आरोपी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात चोरी रकमेपैकी 35 हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आले. तर 5 व्या घटनेतील नागनेवाडी येथील तलावाच्या शेजारी असणाऱ्या ओपन जीम जीममधील 2 लाखाच्या साहित्य चोरी प्रकरणात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या कडुन 40 हजार किमतीचा माल जप्त करण्यात आला.
या गुन्हयामध्ये 6 आरोपी अटक करुन त्यांचे कडून चार गुन्हयातील 1 लाख 90 हजाराचा मुददेमाल जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींची ओळख परेड करावयाची असल्यामुळे त्यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. (Pandharpur, Mangalvedha big theft revealed, Thieves arrested) उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, स.पो.नि. बापु पिंगळे, पो.हे.कॉ. दयानंद हेंबाडे, पो.हे.कॉ. हजरत पठाण, पो.ना. सुनिल मोरे, पो.कों. अजित मिसाळ, पो.कों. अजय शिंदे, पो.कों. वैभव घायाळ सायबर पोलीस स्टेशनचे पो.ना. युसुफ पठाण यांनी गुन्हयाचा कौश्यल्यपुर्ण तपास करुन ऐवज हस्तगत करण्यात व तपासकामी मदत केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा