जागर न्यूज : उन्हाळ्याचे चटके बसण्यास सुरुवात झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत आता बदल करण्यात येत असून आज १ मार्च महिन्यापासून हा बदल अमलात येणार आहे.
थंडीचे दिवस संपूर्ण आता उन्हाळ्याचे वातावरण बनत आहे. दिवसभर उन्हाळा आणि रात्री थंडी अशा वातावरणाचा अनुभव सद्या येत असला तरी उन्हाळा आणि उकाडा यांनी आपले आस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. शाळकरी मुलांना या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये यासाठी आता शाळांच्या वेळा बदलण्यात येत आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा ५ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरणार आहेत. उन्हाचा तडाखा आता दिवसेंदिवस वाढू लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजेपर्यंत भरणार आहेत. दूर अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेतला जातो.
दरवर्षी उन्हाळ्यात सोलापूर जिल्ह्याचे तापमान प्रचंड असते. उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान असलेल्या राज्यातील टॉपटेन जिल्ह्यांमध्ये सोलापूर नेहमीच अव्वल राहिला आहे. सध्या शनिवारी तापमानाचा पारा ३७.६ अंश सेल्सिअसपर्यंत चढलेला होता. सोमवारी २० फेब्रुवारीस तापमान ३६.४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. उन्हाचे चटके चिमुकल्यांना बसणार नाहीत, याची खबरदारी शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षीच घेतली जाते. (Changes in school timings in Solapur district due to summer) मात्र वर्षभरातील सार्वजनिक तथा शासकीय सुट्ट्यांचा विचार करून कधीपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवता येईल, याचा कृती आराखडा तयार केला जातो.
उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका असतो आणि उन्हामुळे अध्यापनाला देखील अडचणी निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीला १ मार्च ते ३० एप्रिल या दोन महिन्यांत शाळांची वेळ सकाळीच असते. यंदाही १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरु होणार आहेत. पण, प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यासंबंधीची माहिती देतील. त्यानंतर तेच उद्या सोमवारी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेणार आहेत. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या दोन हजार ९९७ शाळा सकाळच्या सत्रात भरतील. सर्व शाळांमध्ये त्या निर्णयानुसार अंमलबजावणी केली जाईल .शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी पत्रान्वये ही माहिती दिली असून शाळा सकाळच्या सत्रात सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरविण्याबाबत येणार आहेत.
मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सोलापूरचे तापमान ३७ अंशावर गेले आहे. वाढत्या उन्हामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. दुपारच्या सत्रात बाहेर पडणारे लोकांची संख्या कमी झाली आहे. या वाढत्या उन्हात शाळेतील मुलांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेने सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी नुकताच प्रसिध्द केला आहे. सध्या माध्यामिक सत्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा कामांसाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. कॉफीमुक्त अभियान राबविण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशाचे तंतोतत पालन करण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा