जागर न्यूज : महाराष्ट्र भूषण ती. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पंढरपूरसह सोलापूर जिल्हातील काही शहरात स्वच्छता मोहीम राबवली आणि मोठ्या प्रमाणात स्वच्छता करून एक वेगळा आदर्श घालून दिला असून नागरीकातून देखील या प्रतिष्ठानला धन्यवाद देण्यात येत आहेत.
समाजात अनेक संस्था, मंडळे कार्यरत असतात पण यातील काही मोजक्याच संस्था समाजाचे उतराई होण्यासाठी धडपडत असतात. रायगड जिल्ह्यातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा या प्रतिष्ठानचे नाव देखील असेच समाजसेवी उपक्रमासाठी आदराने घेतले जाते. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त महास्वच्छता अभियान महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर तसेच सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर मंगळवेढा सांगोला अकलूज करमाळा या शहरात स्वच्छता करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे वाळवंट देखील या मोहिमेत चकाचक करण्यात आले आहे. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सामाजीक बांधिलकीची जाणीव ठेवून सतत स्वचच्छता अभियान,वृक्षरोपण आणी संवर्धन, रक्तदान शिबीरे,शैक्षणीक साहित्य वाटप, आरोग्य शिबीरे, धरणातील गाळ काढणे आदी ऊपक्रम राबविले जातात याचीही आठवण उपस्थित पाहुण्यांनी करुन दिली .
पंढरपूर येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने महास्वच्छता अभियान संपन्न झाले यावेळी पंढरपूर तालुक्यातील १७०० श्री सदस्यांनी च्या माध्यमातून ९० टनाच्या पुढे कचरा गोळा करून कचरा डेपो मध्ये पाठवण्यात आला यासाठी नगरपरिषद पंढरपूर कडून घंटागाडी २०, २ टिप्पर, २ कंटेनर, २ जेसीबी तसेच श्री सदस्यांकडून २२ ट्रॅक्टर, ३ छोटा हत्ती यांच्या माध्यमातून सर्व कचरा गोळा केला गेला. यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले 'प्रतिष्ठान चे कार्य बघून आम्ही सर्व भारावून गेलो आहोत. आज तुम्ही आमचा सत्कार करण्यापेक्षा आम्ही सर्वांनी तुम्हा सर्व श्रीसदस्यांचा सत्कार करणार असे सांगितले आणि त्यांनी प्रतिष्ठानचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी विक्रमजी कदम साहेब यांनी अंतर्मनाची स्वच्छता ही श्रवणातून केली जाते असे मत व्यक्त करून मार्गदर्शन केले. स्वच्छता मोहीम पूर्ण करून शहर स्वच्छ झाल्याची भावना सर्व प्रशासन व नागरिकांतून व्यक्त होत आहे. स्वच्छता मोहिम प्रतिष्ठानचे १७०० सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने करतात याचे मान्यवरांनी कौतुक केले आहे यासाठी नगरपरिषद पंढरपूरचे मुख्याधिकारी अरविंद माळी, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य अधिकारी नागनाथ तोडकर यांचे विशेष सहकार्य मिळाले तसेच पंढरपूर विभागाचे उपाधीक्षक विक्रम कदम , शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनीही सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा