जागर न्यूज : वडिलांचा मृतदेह घरात ठेवून मुलगा बारावीची परीक्षा देण्यास गेला आणि त्याने प्रचंड दु:खात गणिताचा पेपर सोडविल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे आज सकाळी आकस्मिक निधन झालेल्या वडीलाचा मृतदेह घरात ठेवून मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याला बारावीच्या परीक्षेसाठी पाठवले, पेपर संपल्यानंतर वडिलांच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला. हुलजंती येथील ६० वर्षे वयाचे कल्लाप्पा आबा रूपटक्के यांचे अकस्मात आज सकाळी निधन झाले. त्यामुळे घरात दुःखाचा डोंगर पसरला अशा परिस्थितीत सर्व नातेवाईक दुपारच्या सत्रात अंत्यविधी करण्यासाठी जमा झाले. घरात शोकाचे वातावरण असतानाच कलप्पा यांचा मुलगा तुकाराम याचा बारावी परीक्षेचा गणित विषयाचा पेपर आजच होता. वडिलाचा अंत्यविधी करायचा की परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर लिहायचा ? हा प्रश्न निर्माण झाला होता. वडिलांच्या निधनाने तुकाराम प्रचंड दु:खात होता आणि अंत्यविधीसाठी त्याचा बारावी परीक्षेचा पेपर बुडणार होता. यामुळे त्याचे एक वर्ष वाया जाणार होते.
बारावीची परीक्षा सुरु असतानाच मुलगा तुकाराम याचा बारावी गणित विषयाचा आज पेपर सोड्डी येथील एम.पी मानसिंगका विद्यालय येथे असल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थांना समजले. त्यामुळे या दुःखद प्रसंगी वडिलांच्या निधनामुळे पेपरला गैरहजर राहून त्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन हुलजंती येथील गोविंद भोरकडे व ग्रामस्थांनी एकत्र येत त्याला परीक्षेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. (Keeping his father's body in the house, the son took the exam) त्याबाबत प्राचार्य बसवराज कोरे यांना हा प्रकार कानावर घातला त्याचा बारावीचा पेपर होईपर्यंत वडिलांचा अंत्यविधी दुपारी दुपारपर्यंत पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे वडिलांचा मृतदेह घरात ठेवून जड अंतकरणाने त्याला परीक्षेसाठी जावे लागले. मनात दु:खाचा कल्लोळ उठलेला असताना आणि वडिलांच्या निधनाने मानसिक स्थिती पुरती कोलमडलेली असताना तुकाराम अखेर वडिलांचा मृतदेह घरात घेवून बारावीच्या परीक्षेला रवाना झाला. या घटनेने अनेकांच्या मनात वेदना झाल्या आणि हळहळ देखील व्यक्त होत राहिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा