जागर न्यूज : कायदा सुववस्था राखण्यास मदत करण्याची जबाबदारी असलेल्या होमगार्डनेच लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी होमगार्डला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांच्या कामात गुहरक्षक दल मदतीला जात असते आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गृहरक्षक दल पोलिसाना मदत करीत असते. पण या दलातील एका जवानानेच चोरी केल्याची अजब घटना उघडकीला आली असून विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. बाळे परिसरातील गुलमोहर सोसायटीतील शिक्षिकेचे घर फोडल्याप्रकरणी होमगार्डला फौजदार चावडी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे. मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथील महेश वसेकर या होमगार्डला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ज्योती वसेकर यांच्या घरातील ५ लाख १५ हजारांचे दागिने चोरीला गेल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती
याप्रकरणी डीबी पथकाचे प्रमुख शंकर धायगुडे हे तपास करताना तसेच गुप्त माहितीदाराने दिलेल्या माहितीवरून केली आणि त्यानुसार पोलिसांनी महेश वसेकर याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केल्यानंतर त्याने कबुली दिली. आरोपी महेश वसेकर याच्या सॅकमधून सोन्याचे दोन गंठण, दोन लॉकेट, दोन अंगठ्या, चार जोडी टॉप्स, चांदीचे पैंजण, लॉकेट असे चोरीला गेलेले सर्व दागिने जप्त केले. शिवाय चोरीत वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. (A home guard in Mohol taluka was arrested for stealing jewellery) वसेकर हा होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास सपोनि विशाल दांडगे करत आहेत. एरवी चोऱ्या तर होतच आहेत आणि सराईत गुन्हेगार कधी न कधी पोलिसांच्या हाती लागत असतात पण होमगार्ड असलेल्या व्यक्तीनेच चोरी केल्याने मात्र खळबळ उडाली असून आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.
:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा