जागर न्यूज : पोलिसाच्या पत्नीनेच आपल्या पोलीस पतीला खल्लास करण्याची सुपारी दिली आणि सुपारी बहाद्दरांनी पोलिसाला गोळ्या झाडून मारल्याचे प्रकरण उघडकीस आले असून पोलिसांनी पाचही हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.
सातारा महामार्गावरील वाढेगाव परिसरात एका व्यावसायिकाची अज्ञात तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडाचा छडा पोलिसांनी लावला असून पोलीस पत्नीनेच आपल्या व्यावसायिक पतीची सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह ५ जणांना अटक केली आहे.४ जानेवारीला मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहरालगत असलेल्या वाढे फाटा येथे वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमित भोसले यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांनी एकूण ६ गोळ्या भोसले यांच्यावर झाडल्या होत्या. त्यानंतर पुन्हा धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला होता. हत्येनंतर हल्लेखोर पसार झाले होते.दरम्यान, सातारा तालुका पोलिसांनी तपासासाठी विविध पथके तयार करून संशयितांचा मागोवा घेणे सुरू केले होते.ज्या ठिकाणी या व्यावसायिकाची हत्या झाली तेथे खूप अंधार असल्याने पोलिसांना कोणताही सबळ पुरावा हाती लागत नव्हता.
पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी पोलीस दलातील अत्यंत चतुर पोलिसांच्या हाती हे प्रकरण सोपवलं. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींच्या शोधात राज्यातील तब्बल ७ जिल्हे पालथी घातली. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर इतर ५ आरोपींना पोलिसांनी गोव्यातून अटक केली. पोलिसांनी आरोपींना खाक्या दाखवताच आपणच अमित भोसले यांची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.
धक्कादायक बाब म्हणजे या हत्येची सुपारी मयत अमित भोसले याच्याच सातारा पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पत्नीनं दिली असल्याचं तपासात निष्पंन्न झालंय. पोलिसांनी अटक केलेले काही आरोपी पुण्यातील असून बाकी आरोपी हे साताऱ्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. मयत अमित भोसले हा पोलिस दलात असलेल्या आपल्या पत्नीला सतत त्रास देत होता. त्यावरून दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. (Conspiracy by wife, murder police husband, Attackers arrested) मृत अमित याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, याच कारणामुळे अमित याच्या पत्नीने त्याची सुपारी आपल्याला दिली असल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा