जागर न्यूज : मृत्यू झालेल्या पत्नीने आपल्या पतीला आणि मुलांना अकस्मात दोन लाख रुपये दिल्याची एक घटना सोलापुरात घडली असून या घटनेने पती आणि मुलांचे डोळे पाणावले.
'आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे' अशी एक म्हण प्रचलित आहे. माणसाच्या नशिबात असले तर कुठूनही आणि कधीही मिळतेच याचा एक वेगळा पण ह्रदयस्पर्शी अनुभव सोलापुरातील एका कुटुंबाला आला आहे. पत्नीचे बँकेतील खाते बंद करण्यासाठी गेलेल्या पतीच्या हातात चक्क दोन लाख मिळाले आणि अकस्मात आणि अनपेक्षित रक्कम पाहून आनंद झाला असला तरी मृत्यू झालेल्या पत्नीमुळे ही रक्कम मिळाल्याने हृदय देखील हेलावले गेले. सोलापुरातील गायकवाड कुटुंबीय राहतात मागच्या काही दिवसांपूर्वी रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी शिल्पा यांचे आकस्मिक निधन झाले.दरम्यान ते मयत झालेल्या पत्नीच्या नावे असलेले बँक खाते बंद करायला गेले होते. यावेळी त्यांना पत्नीच्या खात्यावर वारसांच्या नावे दोन लाख रुपये जमा झाल्याचे आढळले. यामुळे मृत महिलेच्या पती आणि लेकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचे दिसून आले. दरम्यान या गरीब कुटुंबाने बँक मॅनेजरचे आभार व्यक्त केले आहेत.
सोलापुरातील शिल्पा गायकवाड यांचे निधन झाल्यानंतर पती पती रवींद्र गायकवाड हे पत्नीच्या नावावर असलेले बँकेतील खाते बंद करण्यास गेले होते. दरम्यान खात्यावर असणारी थोडी रक्कम आपल्या खात्यावर वळवून घेऊ आणि खाते बंद करू या उद्देशाने ते गेले होते. मात्र, स्टेट बँकेच्या मॅनेजरने सर्व चौकशी करून, प्रधानमंत्री जीवन योजने अंतर्गत पत्नीच्या खात्यावर दोन लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे सांगितले. बँक मॅनेजर यांनी केलेल्या कार्याबाबत रवींद्र गायकवाड यांना काही वेळ विश्वासच बसला नव्हता. बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री जीवन योजनेबाबत सर्व माहिती सविस्तर सांगितली. खाते बंद करायला गेले आणि वारसांच्या नावे दोन लाख रुपये जमा झाल्याने मृत महिलेच्या पती आणि लेकरांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या गरीब कुटुंबाने बँक मॅनेजरचे आभार व्यक्त केले.
सेटलमेंट येथे राहणारे रवींद्र गायकवाड हे बिगारी कामगार आहेत. त्यांना तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. रवींद्र गायकवाड यांची पत्नी शिल्पा गायकवाड या सोलापुरातील रेल्वे स्टेशनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होत्या. एक महिन्यापूर्वी शिल्पा गायकवाड यांचे आकस्मित निधन झाले. शिल्पा गायकवाड यांचा मोठा आधार यांच्या कुटुंबाला होता. शिल्पा यांचे निधन झाल्याने संपूर्ण परिवाराची परवड सुरू झाली. शाखा अधिकारी विशाल गायकवाड यांनी रवींद्र गायकवाड यांच्या परिस्थिती बद्दल माहिती घेतली असता बँक अधिकाऱ्यांनी रवींद्र गायकवाड यांना सदर रक्कम तीन मुलींच्या नावाने एफडी करून देण्यात आली. (Even after death, the wife suddenly gave two lakhs to her husband)भविष्यात मुलींच्या लग्नासंदर्भात किंवा शिक्षणासंदर्भात लाभ घेता येईल. असे शाखा अधिकारी यांनी रवींद्र गायकवाड यांना सांगितले आणि त्यावेळेस रवींद्र गायकवाड यांनी देखील होकार दिला.एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू अशी ही घटना आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा