जागर न्यूज : राज्यातील थंडीचा कडाका सुरु असला तरी येत्या सोमवारपासून गारठा मोठ्या प्रमाणत कमी होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत त्यामुळे हळूहळू आता तापमानात वाढ होत उन्हाळ्याची चाहूल लागणर आहे.
यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झालाच परंतु पावसाळा संपल्यानंतर देखील अनके ठिकाणी अतुवृष्टी झाली होती. हिवाळ्याच्या सुरुवातीला थंडी कमी प्रमाणात होती परंतु नंतर राज्यभरात थंडीचा कडाका भलताच वाढला आणि अवघा महाराष्ट्र गारठून गेला. आता मात्र थंडीपासून सुटका होण्याचे संकेत मिळाले आहेत. उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात महाराष्ट्रात कमकुवत होत असल्याने आगामी पाच दिवसांत राज्यातील थंडी कमी होऊन किमान व कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा थंडीचा कालावधी कमी असला, तरी मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यांत जाणवलेल्या कडाक्याच्या थंडीनंतर सोमवारपर्यंत राज्यातून थंडी कमी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
पहाटेच्या सरासरी किमान तापमानात हळूहळू सुमारे दोन ते तीन अंशांनी वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्यास सुरुवात होईल. निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दुपारच्या कमाल तापमानातही सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच उबदारपणा जाणवतच होता, तो तसाच अजून पुढील 5 दिवस टिकून राहील. (Weather department predicts that cold weather will decrease) पावसाळी ढगाप्रमाणे एकामागोमाग पळणार्या, पण वेगवेगळ्या उंचीवरून आणि दोन तीन दिवसांच्या अंतराने सध्या उत्तर भारतातून सतत जाणार्या पश्चिमी झंझावातामुळे उत्तरेत सध्या पाऊस, बर्फ, धुके, थंडी पडत आहे. १९ ते २६ जानेवारीपर्यंत दोन झंझावाताचा परिणाम उत्तर भारतात जाणवेल. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या उर्वरित भागात बहुतांशी ठिकाणी तापमान १४ अंशांच्या वर गेल्याने गारठा कमी झाला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान धुक्यामुळे दिवसभरात उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने राज्याच्या कमाल तापमानातही वाढ झाली आहे. दरम्यान मागच्या २४ तासांत पुणे 32.1 (12.0), जळगाव 30.5 (15.0), धुळे 30.0 (11.6), कोल्हापूर 30.8 (17.3), महाबळेश्वर 28.1 (14.1), नाशिक 31.8 (11.0), निफाड 30.6 (9.1), सांगली 31.5 (16.8), सातारा 31.7 (13.0), सोलापूर 33.7 (18.2), रत्नागिरी 32.2 (17.7), औरंगाबाद 31.4 (11.6), नांदेड 31.8 (16.2), परभणी 31.1 (17.7), अकोला 33.3 (16.4), अमरावती 30.4 (15.1), बुलढाणा (17.0), चंद्रपूर 29.8 (17.7), गडचिरोली 31.2(15.2), गोंदिया 29.2(14.2), नागपूर 30.0 (15.5), वर्धा 31.2(16.4), वाशीम 32.2 (15.4), यवतमाळ 34.0 (19.0) तापमानाची नोंद झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा