जागर न्यूज : आयकर विभागाने सोलापुरात विविध ठिकाणी धाडी टाकून जवळपास पन्नास कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती उघडकीस आणली असून या धाडींमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
आयकर विभागाच्या मुंबई येथील पथकाने शहरातील काही नामांकित बांधकाम साहित्य विक्रेते, भंगार विक्रेते, कत्तलखान्यावर ब स्टील विक्रेत्यावव सलग तीन दिवस छापा टाकून अंदाजे ५० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती उघडकीस आणल्याने कर चुकवेगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आयकर विभागाने टाकलेल्या या धाडींची गुप्तता पाळली. पथक मुंबईला गेल्यानंतर याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. आयकर विभागाच्या अधिकार्यांनी आसरा चौक, कुमठा नाका, हैदराबाद रोड परिसरातील व्यावसायिकांच्या घरी छापे टाकल्याचे सांगण्यात येते. या छाप्यांमध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचे बोगस व्यवहार आढळून आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
शहरातील भंगार विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. भंगार विक्रेत्यांचा रोखीने झालेला व्यवहार आणि कागदोपत्री व्यवहारामध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आले. शहरातील विविध खरेदीदार हे भंगार गोळा करतात. मुख्य खरेदीदाराला विकतात. मात्र, लोखंड ब ऑल्युमिनियमच्या खरेदीवर जीएसटी आहे. यात रोखीचे ब जीएसटीच्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली. भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखविल्याचे अधिकाऱ्यांच्या पाहणीत आढळून आल्याचे सूत्रांकडून समजले. गेल्यावर्षी शहरातील प्रख्यात बांधकाम व्यावर्मायक यांचे निवासस्थान, कार्यालय, रुग्णालय तसेच नामांकित डॉक्टरांच्या घरावर छापे टाकुन आयकर विभागाने तपासणी केली. पंढरपुर येथील साखर कारखानदार यांचे कार्यालय, निवासस्थान तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील त्यांच्या साखर कारखान्यांबरही आयकर विभागाची धाड पडली होती.
एका कत्तलखान्यावरही छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही दिवमांप्वी आयकर व जीएसटी बिभागाने डेटा एकीकरण झाल्याने नव्या वर्षात ही खाती परस्परांनी केलेल्या कारवाईत माहितीची आदान-प्रदान करणार आहेत. (Big raids of Income Tax Department in Solapur) त्यामुळे आयकर खात्याच्या कारवाईनंतर जीएसटी व्यवहाराचीदेखील तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या व्यावसायिकांच्या मुळेगाब तांडा, आसरा, कुमठा नाका, मोडनिंब ब हैदराबाद रोडवरील व्यवसाय केद्रांवर छापे टाकले गेले आहेत. सोलापुरात पडलेल्या धाडीमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा