जागर न्यूज : पोलीस असल्याचे भासवून आणि एक खून झाल्याची बतावणी करून एका तोतयाने वीस तोळ्याचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केल्याची घटना पुन्हा एकदा घडली आहे.
पोलीस असल्याची बतावणी करून आजवर अनेकांची भर दिवसा आणि भर रस्त्यावर लुटमार झालेली आहे तरीदेखील या फसवणुकीला अनेकजण बळी पडतात. आता पुन्हा एकदा बार्शी शहरात भररस्त्यावर एका तोतयाने सोन्याची लुट केली आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलीस या भामट्याचा शोध घेत आहेत. कोर्टाच्या पाठीमागे उपळाई रोडवर येथे दोघांनी पोलीस असल्याचा बहाणा करून एकजण स्कूटीवरून जात असताना एकास तुमच्या अंगावरील सोने काढून गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवा, असे म्हणून हातचलाखीने सुमारे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. याबाबत अविनाश ऊर्फ राजाभाऊ शिवाजी बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक खून झाला असल्याचे सांगून या तोतयाने हातचलाखी करीत लुटले असल्याचे म्हटले आहे.
स्कूटीवरून दुकानाकडे निघालो असता उपळाई रोड तुकाई देवी मंदिर येथे दोघांनी गाडी थांबवून आम्ही पोलीस आहोत, असे म्हणून त्यांनी कार्ड दाखवत काल मर्डर झालेला असून त्याची चौकशी करत आहे. तरी तम्ही तमच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे हिंदीमधून सांगितल्याने घाबरून घाईघाईत अंगावरील दागिने काढून खिशात ठेवत असताना त्यांनी सोने खिशात ठेवू नका, स्कुटीच्या डिक्कीत ठेवा, सोने सुरक्षित राहील, असे ते म्हणाले. त्यामुळे स्कृूटीचे सीट उचलून आतमध्ये असलेल्या रेनकोटमध्ये साने ठेवले व डिक्की बंद केली.
नंतर मात्र या भामट्याने सोने ठेवल्याबाबतची खात्री करण्यासाठी पुन्हा डिक़ी उघडुन रेनकोटमधील दागिने पाहिले होते. व त्याचवेळी सदरच्या दोन इसमांनी मला बोलण्यात गुंतवून डिकीत हात घातल्याचे मला जाणवले होते. (The fake police stole gold ornaments from the street) त्यामुळे मी लगेच डिकी बंद केली. दरम्यान, ते दोघेजण घाईघार्टने कोर्ट चौकाकडे निघून गेल्याने, मला शंका आल्याने गादीची डिकी उघडली व दागिने चेक केले. त्यावेळी दागिने दिसले नाहीत. याबाबत अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा