जागर न्यूज : राज्यभर विविध कारणांनी गाजत असलेल्या लावणी क्वीन गौतमी पाटील यांच्या अडचणीत आता वाढ होऊ लागली असल्याचे समोर आले असून न्यायालयाने गौतमी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
लावणी क्वीन म्हणून सध्या प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील वेगवेगळ्या कारणांसाठी गाजते आहे. गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. गौतमीच्या नृत्याचे जितके चाहते आहेत, तितकेच तिच्या सौंदर्यावर आणि फॅशनवर देखील फिदा आहेत. गौतमी पाटील यांच्या लावणी कर्यक्रमात अनेकदा गोंधळ, धुडगूस, राडा असे प्रकार देखील समोर आले आहेत. राज्यभर तिचे असंख्य चाहते आहेत मात्र, आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणीकार गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारा कोर्टाने दिले आहेत.
गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तिच्या अनेक कार्यकामांमद्धे प्रेक्षकांनी हैदोस घातला. त्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती. गौतमी पाटील हीच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावेळी गौतमी वर लावणी क्षेत्रातील अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती.
गौतमी आपल्या कार्यक्रमात अश्लिल हावभाव करते, लोकांना घाणेरडे हातवारे करते, शॉर्ट कपडे घालते हे असले प्रकार लोककलेत व लावणीत येतच नाहीत. लावणीकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी. (Court Order to file a case against Lavani Queen Gautami Patil) तिने लावणीच करावी अश्लीलपणा करू नये असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती. आता न्यायालयानेच तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा