जागर न्यूज : अलीकडे सतत चर्चेत असलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पुन्हा एकदा अडचणीत येत असल्याचे दिसत असून त्यांनी एका शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाचे काही आमदार गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या वादात अडकत आहेत. विशेषत: शिवराळ भाषा, धमक्या यामुळेच काही आमदार चर्चेत आणि वादात आलेले आहेत. यात मंत्री असलेले अब्दुल सत्तार, संजय बांगर हे सर्वाधिक वादात चर्चेत आलेले आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे देखील सतत चर्चेत येत आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त कारणाने नेहमी चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट शिंदे गटावर नाराजी व्यक्त केल्याने ते पुन्हा ठाकरे गटात जाणार का यावर जोरदार चर्चा रंगली होती. दरम्यान आमदार गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी एका शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची कबुलीही दिली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शिंदे गटाचे आमदार सातत्याने वादात सापडत आहेत. वादग्रस्त वक्तव्यं आणि आक्षेपार्ह भाषेमुळे शिंदे गटाचे नेते अडचणीत येताना दिसले आहेत. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांना 'सक्तीचे मौन' बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, यापासून शिंदे गटातील नेत्यांनी काहीही धडा घेतल्याचे दिसत नाही. कारण, आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक नवा वाद ओढावून घेतला आहे. उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करा, असा फोन करणाऱ्यास बुलढाण्याच्या आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संभाषणाची एक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. संजय गायकवाड यांनी ही क्लीप माझीच असल्याचे स्पष्ट केले आहे.
अनिल गंगतिरे या व्यक्तीने संजय गायकवाड यांना फोन केला होता. यावेळी त्याने गायकवाड यांना बोदवड परिसर उपसा सिंचन योजना कधी पूर्ण होणार, असा आशयाचा सवाल विचारला. यावर संजय गायकवाड चांगलेच वैतागले. बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आहे. त्यासाठी मी केंद्र आणि राज्य सरकारकडून ११०० कोटींचा निधीही मंजूर करुन घेतला आहे. आता फक्त निविदा निघण्याची प्रक्रिया सुरु आहे. या मार्च महिन्यात योजनेचे काम सुरुही होईल. त्यामुळे तुम्ही आता काहीतरी नौटंकी करुन राजकारण करु नका, असे गायकवाड यांनी गंगतिरे यांना सुनावले. यावर संबंधित नागरिकही आमदार गायकवाड यांच्याशी हुज्जत घालू लागला. त्यामुळे संजय गायकवाड यांच्या संतापाचा पारा आणखीनच चढला आणि त्यांनी या नागरिकाला शिवीगाळ केली.
मला मुंबई मंत्रालय येथून एक फोन आला आणि सिंचन योजना संदर्भात चुकीची माहिती देऊन बोलत होता. त्यामुळे अश्या लोकांना त्यांच्याच भाषात उत्तर मी दिल आहे असे आमदार गायकवाड यांनी सांगितले आहे. मी खानदानी शेतकरी असून माझ्यासाठी तो सिंचन प्रकल्प महत्वकांक्षी आहे. (MLAs from Shinde group abused the farmers) त्यासाठी निधी मंजूर झाला असून मी स्वतः बैठका घेतल्या आहेत. मात्र त्या सिंचन प्रकल्प संदर्भात मला फोनवरून चुकीची माहिती बोदवडचा शेतकरी देत होता. त्यामुळे मी उत्तर दिलं आहे असे आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा