जागर न्यूज : शेतकरी आणि सामान्य कुटुंबात होत असलेल्या आत्महत्या नेहमीच समोर येत असताना तहसीलदार यांच्या पत्नीने देखील आत्महत्या केल्याची एक घटना समोर आली असून यामुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महिलांच्या आत्महत्या या बहुतेकवेळा हुंडाबळी असतात किंवा चारित्र्याचा संशय घेतला जात असल्यामुळे होत असलेल्या छळातून होत असतात परंतु एका नायब तहसीलदाराच्या अनैतिक संबंधाला कंटाळून त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या जयश्री पोलास या शिक्षिका असून त्यांचे पती गणेश पोलास ही नायब तहसीलदार आहेत. जयश्री या जालना तालुक्यातील नेर जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या तर नायब तहसीलदार गणेश पोलास यांच्या पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे.आपल्या नायब तहसीलदार पतीचे इतर महिलेशी संबंध असल्याच्या रागातून त्यांच्या दोघात वाद झाल्याने त्यांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जालना शहरातील मोतीबाग परिसरात असलेल्या मोती तलावात दुपारच्या सुमारास एका ४८ वर्षीय विवाहितेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मोतीबाग तलाव परिसरात चौपाटीवर काही नागरिक बसलेले असताना रागाच्या भरात आलेल्या जयश्री यांनी नागरिकांच्या समोर तलावाच्या भिंती वरुन तलावात उडी घेतली. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयन्त केला मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.घटनेची माहिती मिळताच चंदणझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून महिलेचा मृत्युदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.डॉक्टरांनी महिलेचा मृत्यु झाल्याची घोषणा केल्यानंतर महिलेचा शोध पोलिसांनी घेतला असता आत्महत्या करणाऱ्या महिला ह्या नायब तहसीलदार गणेश पोलास यांच्या पत्नी असल्याची आहेत.
जयश्री तालुक्यातील नेर जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत असून या प्रकरणी चंदणझिरा पोलीस अधिक तपास करत असून रात्री उशिरा प्रयन्त गुन्हा दाखल करण्यात आला (Tehsildar's teacher wife committed suicide)आहे. आपल्या पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याने त्यांनी स्वत:चे जीवन संपवले आहे. या घटनेने खळबळ तर उडालीच आहे परंतु हळहळ देखील व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा