जागर न्यूज : पोटाच्या मुलीचा खून करून तिला जाळून टाकले आणि तिची राख ओढ्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आई वडिलांनीच एवढा धक्कादायक प्रकार केला आणि काही घडलेच नाही असा देखावा केला परंतु या घटनेची चर्चा झाली आणि पोलीस या मयत मुलीच्या आईवडिलांपर्यंत पोहोचले आणि एका मोठ्या अपराधाची उकल झाली पोटच्या मुलीची हत्या करून आई वडिलांनी मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे एका कुटुंबानेच मुलीची हत्या केली. हत्येनंतर मुलीचा मृतदेह शेतात जाळून टाकला. गावात बातमी पसरल्यानंतर पोलिसांनी घटनस्थळी पोहोचत आरोपींना अटक केली आहे. मृत तरुणी ही बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होती. प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
नांदेड जिल्ह्यातील महिपाल पिंपरी इथं हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे आई-वडील, दोन भाऊ आणि मामा अशा पाच जणांना अटक केली आहे. मृत मुलगी बीएचएमएसमध्ये तिसऱ्या वर्षांत शिकत होती. गावातील तरुणासोबत तिचे प्रेम संबंध होते. पण कुटुंबियांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वीच दुसरीकडे तिचे लग्न ठरवले होते. मात्र आठ दिवसापूर्वी तिचे लग्न मोडले. लग्न मोडल्याने गावात बदनामी होत असल्याचे म्हणत कुटुंबियांना राग अनावर झाला.कुटुंबियांनी मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर गुपचूप मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. यानंतर मृतदेहाची राख बाजूच्या ओढ्यात टाकून दिली. तीन दिवसांपासून मुलगी गावात दिसत नसल्याने गावात चर्चा सुरु झाली. यानंतर कुटुंबियांनीच मुलीला संपवल्याची माहिती गावात पसरली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळ गाठले आणि तपास सुरु केला. चौकशी केल्यानंतर कुटुंबियांनीच मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
"मुलीला तिच्या कुटुंबियांनीच मारून टाकलं किंवा काही बरं वाईट केल्याची चर्चा गावात होती. याबाबत बातमीदाराने माहिती दिल्यानंतर त्याची शाहनिशा करण्यात आली. या मुलीचे दुसरीकडे लग्न जुळले होते मात्र तिचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. (Parents killed their daughter and destroyed the evidence) याच कारणावरुन घरच्यांना राग आला आणि त्यांनी मुलीचा गळा आवळून खून केला. यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकला. मिळालेल्या प्राथमिक माहितीवर तपास सुरु असून आणखी सखोल तपास करण्यात येणार आहे. यामध्ये पाच आरोपींनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे," असे लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा