जागर न्यूज : ग्रामपंचायत कर भरला असेल तरच ग्रामसभेत बोलण्याचा अधिकार दिला जाईल असा एक फलकाच ग्रामपंचायत सरपंचाने लावल्याने प्रजासत्ताक दिली संपूर्ण गावच संतप्त झाले आहे.
गावकरी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना निवडून देतात. निवडणुकीआधी बरीच काही आश्वासने दिली जातात पण निवडणूक झाल्यावर आणि निवडून आल्यावर आपण कुठल्यातरी वेगळ्या ग्रहावरचे आहोत असाच अविर्भाव काहींचा असतो आणि मग मनमानी करण्यास सुरुवात होते. साहजिकच गावकरी नाराज आणि संतप्त होतात आणि पुढच्या निवडणुकीत दणका देतात. बारामती च्या शिरवली येथील ग्रामस्थांना असाच संताप करण्याची वेळ ऐन प्रजासत्ताक दिनादिवशी आलेली आहे. ग्रामपंचायत कर दिल्याशिवाय प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत बोलता येणार नाही असा अजब फतवा सरपंचाने काढला आहे. साहजिकच गाव खवळले असून संताप व्यक्त केल जात आहे. ग्रामस्थांनी कर भरणे आवश्यकच आहे पण ग्रामपंचायतीने देखील सुविधा देण्याची गरज आहे.
विजेचा पत्ता नसताना विद्युतकर घेतला जातो आणि उघड्या गटारी घाण पसरवित असताना आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका होत असताना आरोग्य कर अथवा स्वच्छता कर या नावाने वसुली केली जाते. प्रत्यक्ष सुविधा न देता गावकरी मंडळीना त्रास होत असताना ग्रामपंचायत कर मागतेच कशी ? असा सवाल देखील उपस्थित होत असतो. पिण्याचे पाणी न देता पाणीपुरवठा कर मागितला जातो. अशा बाबी हास्यास्पद असताना देखील कराच्या पावत्या घरोघरी पोहोचविल्या जातात. शिरवली येथे तर चक्क बोलण्यावरच बंदी घातली गेली आहे. सुविधा दिल्या जात नाहीत म्हणून गावकरी कर देत नाहीत आणि सुविधा नसल्याबाबत बोलायचे तर तेथेही बंदी घातली जाते असा अजब प्रकार समोर आला आहे भरलेल्या ग्रामस्थांनाच ग्रामसभेत बोलण्याचा अधिकार दिला जाईल, अशा आशयाचा बोर्ड ग्रामपंचायतीसमोर लावण्यात आल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांनी देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कर भरलेल्या पावत्या असल्याशिवाय ग्रामसभेला उपस्थित राहू देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभेत प्रत्येक नागरिकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्याला कोणीही बंधन घालू शकत नाही. ग्रामपंचायतीच्या या अजब फतव्यामुळे गावकरी संतापलेले आहेत. ग्रामसभा हे गावाचा परिपूर्ण विकास साधण्यासाठी ग्रामस्थांच्या हातात असणारे प्रभावी साधन आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेला उपस्थित राहून कामकाज व विविध योजना समजून घेतल्या तर गावाचा विकास खूप गतीने होईल. उपेक्षित व वंचितांना सर्व शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवून देता येतो. राज्यघटनेने पंचायत राज व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. (Banned from speaking in Gram Sabha if Gram Panchayat tax is not paid) गाव पातळीवर काम करणारी व लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांमार्फत चालवली जाणारी ग्रामपंचायत ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे. मात्र सरपंच कार्यकारणीने घेतलेल्या या निर्णयाला ग्रामस्थांनी सोशल मीडियातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा