पंढरपूर शहर आणि परिसरातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ७ कोटी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
सन २०२२-२३ साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून पंढरपूर शहर, परिसरातील रस्ते खडीकरण, डांबरीकरण व अग्निशमन इमारत बांधकाम आदी कामांसाठी ७ कोटी १२ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
महावितरण कार्यालय - संत तनपुरे महाराज मठ- कन्या प्रशाला रस्ता खडीकरण डांबरीकरण, भक्तनिवास ते स्टेशन रोड रस्ता खडीकरण डांबरीकरण, प्रशांत परिचारकनगर मधील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, गट नं. १०० कासेगाव ते कचरा डेपो रस्ता खडीकरण डांबरीकरण, विठ्ठलनगर, मानसनगर, येळेवस्ती येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, गुरूदेवनगर येथील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण, मनिषानगर कुंभार घर ते सयाजी आसबे घर रस्ता खडीकरण मुरमीकरण, पद्मनाथ मंगल कार्यालय, सुनिल पाटील मळा ते एकतानगर रस्ता खडीकरण डांबरीकरण, पवार वस्ती ते पश्चिमेकडे वांगीकरनगर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण आदी कामांसाठी एकूण ५ कोटी २२ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे.
दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत सन भिंगे चौक ते वैभव हार्डवेअर शॉप रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, अग्निशामन कार्यालय परिसर ट्रॅक व रोड विकसित करणे, गणपती हॉस्पिटल ते टकले हॉस्पिटल नविन कराड नाका रस्ता खडीकरण डांबरीकरण या कामांसाठी १ कोटी १६ लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. (Fund approved for Pandharpur development, informed by Prashant Paricharak) अग्निशामन जिल्हा स्तरावरून अग्निशामन इमारत उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी ७३ लाख ९० हजार रूपये मंजूर झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा