जागर न्यूज : पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लवकरच नुतनीकरण केले जाईल असे आश्वासन आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे बोलताना दिले आहे.
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरी नागरी दुमदुमून गेली असून भक्तीचा महासागर अनुभवायला मिळत आहे. पंढरपुरात भक्तीचा महापूर आला आहे. चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे. पंढरपुरात हरी नामाचा जयघोष सुरू असून अवघी पंढरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मानाचा वारकरी होण्याचा मान औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कलावती साळुंखे यांना मिळाला आहे.
महापूजेच्या नंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लवकरच नुतनीकरण केले जाईल असे सांगून विठ्ठल मंदिराचे पुरातन स्वरूप जतन केले जाईल असेही फडणवीस यांनी सांगितले. पंढरपूर कॉरिडॉर करताना सर्वांना विश्वासात घेऊन केला जाईल. सोबतच श्री विठ्ठल मंदिराचे पुरातन रूप जपण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. लवकरच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि संत नामदेव पायरीचे नुतनीकरण केले जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणतेही पाड काम करणार नाही. गरज पडली तर त्याला योग्य मोबदला दिला जाईल असा विश्वास त्यांनी दिला.
विकास आराखड्याबाबत बोलताना त्यांनी स्थानिकांना विश्वासात घेतले जाईल असे स्पष्टपणे सांगितले. स्थानिक नागरिक, भाविकांना विश्वासात घेऊन पंढरपूर विकास आराखडा तयार केला जाईल. मुख्यमंत्री असताना चार वेळा आणि कार्तिकीचीही महापूजा करण्याचे भाग्य लाभले हा विलक्षण योग असल्याचे फडणवीस म्हणाले. (Vitthal Rukmini temple in Pandharpur to be renovated soon) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातन रूप जपण्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. मंदिर नुतनीकरणाचे काम लवकर हाती घेण्याच्या सूचना ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा