जागर न्यूज : शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच घेताना सापडल्यापासून अनेक प्रकरणे समोर येत असतानाच शिक्षकांच्या बदल्यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे शिवानंद भरले यांनी केली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण लोहार यांना २५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे त्यानंतर त्यांचे अनेक कारनामे बाहेर येत आहेत. लोहार यांनी प्रशासनाला हाताशी धरून शिक्षकांच्या अनेक नियमबाह्य बदल्या केल्याची तक्रार आता शिक्षक संघटनांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण आस्थापना व सामान्य प्रशासनाची चौकशी करावी अशी भरले यांनी मागणी केली आहे.
जिल्हा परिषद सामान्य प्रशासन व शिक्षण विभागाच्या संगनमताने शासनाचे ऑनलाईन संगणकप्रणाली बदल्याचे धोरण डावलून काळ वेळ न बघता शेकडो शिक्षकांच्या केवळ हायकोर्ट व विभागीय आयुक्ताचा संदर्भ घालून बदल्या केल्या आहेत. शैक्षणिक वर्षाचाही विचार केला नाही. शिवाय या बदल्या अर्थपुर्ण व्यवहारांनी झालेल्या आहेत असे सर्वत्र चर्चेला जात आहे त्यामूळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग समाजात बदनाम होत आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत आरटीई अॅक्टनूसार इ ६,७,८ वर्गासाठी विज्ञान विषय शिक्षक भरती केले आहेत पण त्या शाळेतील समाजशास्त्र विषय शिक्षक तिथेच ठेवले आहेत. आज जिल्ह्यामध्ये ४००ते ५०० शिक्षक अतिरीक्त त्या शाळेत काम करतात त्यांचा पगार इतरत्र शालार्थ आयडीला दाखवून या अतिरिक्त शिक्षकाचे वेतन काढले जाते. शासनाचे पैसा वायरीत खर्ची टाकला जातो. कांही ग्रामीण भागातील शाळेतील अतिरिक्त शिक्षकाची नियुक्ती शहरी भागात दाखवून जादा घरभाडे भत्ता देण्यात आले आहे. काही शिक्षकांची यापूर्वी बदली होऊनसुध्दा बदलीच्या शाळेवर हजर न होता सतत सहा महिने शालेय कामी नवरा दाखवून पगार काढला आहे असा आरोप करण्यात आला आहे.
पुन्हा पुन्हा पदस्थापनेत बदल करून देणे या सर्वच गोष्टी जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाच्या संगनमताने घडल्या आहेत. त्यामुळे सामान्य शिक्षकावर अन्याय होत आहे. शिवाय शिक्षण विभागाची बदनामी होत असून त्याचा परिणाम शिक्षक आणि शिक्षणावर होत आहे. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेऊन शिक्षण विभागाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शिक्षणाधिकारी लोहार यांना लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर शिक्षण विभागाचे अनेक प्रकरणे बाहेर येत आहेत. शिक्षण विभाग व प्रशासन यांच्या संगणमताने अनेक नियमबाह्य प्रकार घडले असून त्यात मोठे आर्थिक उलाढाल झाल्याचे आता बोलले जात आहे. (Demand inquiry into teacher transfers) त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जावी अशी आता मागणी जोर धरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा