टी २० विश्वचषक स्पर्धा ऐन रंगतदार स्थितीत असताना क्रिडा विश्वात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. श्रीलंका टीमचा विस्फोटक फलंदाज धनुष्का गुनातिलका याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
श्रीलंकन क्रिकेटपटू दानुष्का गुणथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन टीमसह तो ऑस्ट्रेलियात टी २० वर्ल्ड कप खेळण्यासाठी गेला होता. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली आहे. टीमशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. ३१ वर्षीय दानुष्का गुणथिलकाला अटक करुन रविवारी पहाटेच्या सुमारास सिडनी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. २ नोव्हेंबरला दानुष्का गुणथिलकाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. बलात्काराच्या आरोपाखाली दानुष्का गुणथिलकाला अटक करण्यात आली आहे. श्रीलंकन टीम त्याच्याशिवाय मायेदशी रवाना झाली आहे. धनुष्काला ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथून अटक झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ धनुष्का शिवाय परतला आहे.
श्रीलंकन टीमच वर्ल्ड कपमधील आव्हान आधीच संपुष्टात आलं होतं. शनिवारी श्रीलंकेचा इंग्लंडने पराभव केला. दानुष्का गुणथिलकाला पहिल्या राऊंडमध्ये नामीबिया विरुद्ध खेळला. त्यावेळी तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर तो दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. श्रीलंकन टीमचा नामीबियाकडून पराभव होऊनही ते सुपर १२ साठी पात्र ठरले होते. न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी आपल्या वेबसाइटवर या अटकेची माहिती दिलीय. त्यांनी नाव घेतलेलं नाही. फक्त श्रीलंकन नागरिकाला अटक केली, एवढाच उल्लेख आहे. रोझ बे येथे श्रीलंकन महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दानुष्का गुणथिलकाची ऑनलाइन डेटिंग App वरुन महिलेबरोबर ओळख झाली होती. २ नोव्हेंबर २०२२ बुधवारी संध्याकाळी त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला.तपासाचा भाग म्हणून विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी रोझ बे येथील पत्त्यावर जाऊन गुन्हा घडला, त्या ठिकाणाची पाहणी केली. सिडनीच्या ससेक्स स्ट्रीटवरील हॉटेलमधून पोलिसांनी आरोपीला अटक केली. (Aggressive batsman arrested on charges of rape) श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने अजून यावर स्टेटमेंट जारी केलेलं नाही. दानुष्का गुणथिलका ३ आठवड्यापूर्वीच दुखापत झाली होती. त्याच्याजागी एशेन बनडाराचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा