टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत फायनल धडकणार असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असून इंग्लंडला भारत सहज नमवू शकतो अशी परिस्थिती आहे.
भारतीय संघ टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी आता काही अंतर दूर आहे. टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दुसरी सेमीफायनल गुरुवारी, १० नोव्हेंबर २०२२ रोजी अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडला बाहेरचा रस्ता दाखवून मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश करेल असं निश्चित भाकीत करण्यात आलं आहे. क्रिकेट समिक्षकांच्या मते भारत हा इंग्लंडवर विजय मिळवतं फायनलमध्ये पोहोचण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
टी २० विश्वचषक क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये आतापर्यंत २२ सामने झाले आहेत, त्यापैकी १२ सामने टीम इंडियाने जिंकले आहेत, तर १० सामने इंग्लंड संघाने जिंकले आहेत.तर टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने २ सामने जिंकले आहेत तर इंग्लिश संघाने १ सामना जिंकला आहे. २०१२ साली भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषकात शेवटचा सामना खेळला गेला होता. २०१२ मध्ये श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाने इंग्लंडचा ९० धावांनी पराभव केला होता.
या शानदार सामन्यात इंग्लिश संघाचा पराभव करण्यात टीम इंडिया यशस्वी ठरल्यास अंतिम फेरीत प्रवेश निश्चित होईल. टीम इंडिया आता ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता यावेळी टी २० विश्वचषक २०२२ ची ट्रॉफी त्याच्यापासून फार काळ दूर राहणार नाही. (Indian cricket team will play the final match)असं झाल्यास भारत १५ वर्षांनंतर टी २० विश्वचषक ट्रॉफी जिंकेल. यापूर्वी २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी २० विश्वचषक जिंकला होता.
२००७ साली भारत आणि इंग्लंड यांच्यात टी २० विश्वचषकातील पहिला सामना खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाने १८ धावांनी विजय मिळवला. हा तोच सामना आहे, ज्यात भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या ६ चेंडूत ६ षटकार ठोकले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा