जागर न्यूज : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना अखेर निलंबित करण्यात आले असून त्यांची खुली चौकशी करण्यासाठी देखील परवानगी मिळाली आहे. लोहार यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
वर्गवाढीसाठी युडायस प्लसचा प्रस्ताव शिक्षण संचालकांना पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना अटक होऊन देखील अद्याप निलंबित करण्यात आलेले नव्हते परंतु आज अखेर शिक्षण सचिवांनी लोहारांना सेवेतून निलंबित केले आहे. कोट्यवधींचा बंगला, प्लॅट, फ्लॉट व दागिने लोहारांकडे सापडले आहे. आता पुणे लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षकांनी त्यांच्या खुल्या चौकशीला परवानगी दिली आहे.
लोहार यांच्याकडे मोठी मालमत्ता असून त्याबाबत अजून पूर्ण चौकशी होणे बाकी आहे . त्यांची खुली चौकशी करण्यास परवानगी मिळाली असल्यामुळे आता त्यांनी कुठे कुठे पैसे गुंतवले आहेत हे समोर येणार आहे. तत्पूर्वी, २०१३ मध्ये शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झालेलेल्या लोहारांची आता लाचखोरीची चौकशी होईपर्यंत सेवेतून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, लाचलुचपतच्या चौकशीत त्यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आढळल्यास त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. शिक्षण सचिवांनी किरण लोहारांचे केले निलंबन करण्यात आले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत नोकरीतून निलंबित राहणार आहेत.
लोहार यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांच्या जागी शिक्षणाधिकारीपदी संजय जावीर यांची प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. लाच प्रकरणात सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून किरण लोहार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर किरण लोहार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
राज्य शासनाने किरण लोहार यांना निलंबित केल्यानंतर सोलापूर न्यायालयाचा लोहार यांना काहीसा दिलासा दिला आहे. गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वात आलेला असून साक्षीदारांवर दबाव आणण्याचा कोणताही प्रश्न येत नाही, तसेच आरोपी हा कोठेही पळून जाणार नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. (Bribery Kiran Lohar suspended, but granted bail) हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर लोहार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा