जागर न्यूज : उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार रात्रीच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात असा खळबळजनक गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधव यांनी केला असून या दाव्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
गेल्या साडे तीन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ होत असून शिवसेना फोडण्यात भाजपला यश आहे आहे. नाही नाही म्हणत 'हा आपलाच डाव होता' असे भाजप नेत्यांनी जाहीरपणे सांगितले आहे त्यामुळे चाळीस आमदार फुटण्यामागे कुणाचा हात होता हे आता काही लपून राहिले नाही. राज्यातील राजकारणात मागील काही महिन्यांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिदेंसह शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढत गेल्या. आता ठाकरे गटातील नेते सातत्याने शिंदे गटावर टीकास्त्र सोडताना दिसतात. मात्र, आता नुकतंच शिंदे गटाच्या खासदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. बुलडाणा जिल्हा दौऱ्यादरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
उद्धव ठाकरे गटामध्ये राहिलेले १४-१५ आमदार त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार रात्रीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात. यासोबतच मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. हे स्वतः मी पाहिलं असून आमच्या संपर्कात हे आमदार आहेत, असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील आमदार आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार अस्वस्थ आहेत. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश हा शिंदे गटात होईल. आगामी निवडणूकीपूर्वी त्यांचा शिंदे गटात प्रवेश होईल, असा गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधव यांनी केला असून खळबळ माजवून दिली आहे.
शिवसेनेतील आणखी काही आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या सतत उडत आहेत शिवाय अनेक आजीमाजी पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. राष्ट्रवादीचे काही नेते, आमदार देखील फुटणार असल्याच्या चर्चेने राजकारणात खळबळ उडवून दिली असून यात कितपत तथ्य आहे याबाबत मात्र शंका व्यक्त होत असताना खासदार जाधव यांनी केलेल्या दाव्यामुळे मात्र पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. (MLAs from Uddhav Thackeray's group meet the Chief Minister at night) ठाकरे यांच्याकडील काही आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगितले जात असतानाच हे आमदार रात्रीच्या वेळेस मुख्यमंत्री शिंदे यांना भेटत असल्याचा नवा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा