जागर न्यूज :काँग्रेस पक्षाचे बडे नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे वय ८२ वर्षांचे आहे परंतु त्यांनी तब्बल दहा ते बारा किलोमीटर अंतर पायी चालत पार केले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चाळीशी ओलांडली की माणूस थकू लागतो आणि साठी ओलांडल्यावर थोडेसे अंतर देखील चालणे कठीण होते. सुशीलकुमार शिंदे यांच्या बाबतीत मात्र हे सगळेच गणित चुकिचे ठरले आहे. वय वाढत राहिले तरी सुशीलकुमार शिंदे हे ताजे टवटवीत दिसत राहिले आणि त्यांचा उत्साह देखील तेवढाच वाढत दिसत राहिला. अनेक पदावर कामे केलीच पण शारीरिक थकवा आल्याचे कधी त्यांना जाणवले नाही. आता तर वयाच्या ८२ व्या वर्षी तब्बल अकरा बारा किलोमीटर अंतर त्यांनी पायी चालण्याचा विक्रमच केला आहे. देशाच्या राजकारणात बलाढ्य नेत्यांपैकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे एक आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात राजकारणापासून अलिप्त राहण्याची घेतलेली भूमिका विरोधकांच्या पथ्यावर पडेल, अशी स्थिती आहे. मात्र, आता पुन्हा एक ते राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वयाच्या ८२व्या वर्षी देखील ते शारीरिकदृष्ट्या ते खूप तंदुरुस्त असल्याची प्रचिती ‘भारत जोडो’त राहुल गांधींसोबत तब्बल १०-११ किलोमीटर चालताना आली. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकारणात सक्रिय होतील की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या माध्यमातून सरकारी नोकरी सोडून राजकारणात एन्ट्री केलेल्या सुशीलकुमार शिंदेंची ताकद देशाच्या राजकारणात वाढली होती. अशावेळी मनात आणले असते तर मुलगी प्रणिती शिंदेंना राज्यात केव्हाच मंत्रिपद दिले असते. विधानपरिषदेवर पण घेतले असते. तरीदेखील त्यांनी तसे न करता ‘शहर मध्य’मधून २००९ची निवडणूक लढायला लावली. त्यानंतर सलग तीनवेळा प्रणिती शिंदे तेथून आमदार झाल्या. मोदी लाट, ‘एमआयएम’ची क्रेझ आणि स्वकियांचा विरोध, असा चक्रव्यूह त्यांनी भेदला. त्यांना पक्षाने प्रदेश कार्याध्यक्षपद दिले आणि त्यांची ओळख महाराष्ट्रभर पोचली. परंतु, एकीकडे राज्याच्या राजकारणात प्रणिती शिंदेंची ताकद वाढत असतानाच त्यांना ‘होम पिच’वर पराभूत करण्याचा डाव विरोधकांनी आखायला सुरवात केली.
‘फोडा व राज्य करा’ ही विरोधकांची कूटनीती ओळखून सुशीलकुमार शिंदे पुन्हा राजकारणात सक्रिय होतील, हे निश्चित मानले जात आहे. सध्या पक्षाला व जिल्ह्याला त्यांची गरज असून त्यांची सक्रियता विरोधकांसाठी चिंता वाढवणारी आणि काँग्रेससाठी फायद्याची ठरणार आहे. कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसतानाही सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ते देशाचे गृहमंत्री, अशी पदे भूषविली. २३ एप्रिल १९७३ ते २०१४ अशा तब्बल ४९ वर्षांत त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत स्वत:साठी ना साखर कारखाना ना शैक्षणिक संस्था उभारली. आपल्या कार्यकर्त्यांना मात्र त्यांनी सढळ हाताने मदत केली.
आता त्यातीलच काहीजण त्यांच्याच विरोधात प्रणिती शिंदे यांच्या पराभवासाठी प्रयत्न करीत आहेत, हे विशेष. २००९ ते २०१९ या तिन्हीवेळेस विशेषत: २०१४ नंतर मोदी लाट असतानाही आमदारकीची हॅटट्रिक केलेल्या आमदार प्रणिती शिंदेंच्या पराभवासाठी आता स्वकियांसह विरोधकांनी रणनीती आखायला सुरवात केली आहे. (At the age of 82, Sushil Kumar walked twelve kilometers)पण पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे राजकारणात सक्रिय होतील की काय ? असा प्रश्न आणि चिंता अनेकांना पडली असल्याचे दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा