यावेळी सरकरी वकील चंदणे यांनी जोरदार युक्तिवाद करत आव्हाडांच्या जामिनाला विरोध केला. 'व्हिडीओ पाहिलात तर कळेल जाणीपुर्वक ढकललं आहे. महिलेने तक्रार दिली की तिचा खांदा जोरात दाबला गेला. ओळखीची महिली होती तर मग तोंडाने सांगितले पाहिजे होते हाताने धरुन बाजूला करणे योग्य आहे का? यात अनेक साक्षीदार आहेत आणि पुढे तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना अटक पूर्व जामीन देवू नये', असं म्हणत पोलीस आणि सरकारी वकिलांनी आव्हाडांच्या अटक पूर्व जामिनाला जोरदार विरोध केला.
जागर न्यूज : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या
विनयभंग गुन्ह्यात अटकपूर्व अर्जावर न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून दुपारी न्यायालय याबाबत
निर्णय देणार आहे त्यामुळे ही प्रतीक्षा आणखी काही तासांनी वाढली आहे.
राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने
विनयभंगाची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आज ठाणे कोर्टामध्य
सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आव्हाड यांच्यावरील जामीन अर्जाचा निर्णय राखून
ठेवला आहे. दुपारी २ वाजता निकाल दिला जाणार आहे.ठाण्यातील पूल उद्घाटनाच्या
कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला हात धरून बाजूला केलं होतं. या
प्रकरणी आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याविरोधात त्यांनी
कोर्टात धाव घेतली. आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज
ठाणे कोर्टामध्ये सुनावणी झाली.
एसीपी सोनाली ढोले यांनी या प्रकरणी
मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण संवेदनशील आहे. हाताने
बाजूला केले आहे. आरोपी राजकीय बलाढ्य व्यक्ती आहे त्यामुळे अटक पूर्व जामीन दिल्यास
गुन्ह्यावर परिणाम होईल. त्यांना अटक पूर्व जामीन देवू नये. तसंच वर्तकनगर
पोलिसांनी दिलेल्या जामिनात अट आहे. जामिनावर असताना कोणताही गुन्हा करु नये, अशी मागणी ढोले यांनी केली, तर आव्हाड यांच्या वतीने गजानन चव्हाण
यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात लॅपटॉप आणला होता. (Decision on pre-arrest
application of nationalist MLAs in the afternoon) ज्यावर न्यायाधिशांना घडलेल्या
प्रकाराची क्लिप दाखवली
मुख्यमंत्री आले होते उद्घाटनला त्यावेळे खूप गर्दी होती
चेंगराचेंगरी झाली असती. पत्रकार पडले असते लोकं पडले असते. घटनेच्या आधी देखील
धक्काबुक्की झाली होती. ही सर्व राजकीय खेळी आहे. मी पहिल्यांदा निवडून आले तेव्हा
१५ हजार मतांनी निवडून आलो. दुसऱ्यांदा मी ५० हजार मतांनी निवडून आलो. तिसऱ्यांदा
मी ७५ हजारांनी निवडून आलो. हेच काही जणांना आवडत नाही. मी मंत्री राहिलोय, मी गेली १५ वर्षे आमदार आहे. राष्ट्रवादी आणि भाजप / शिंदे गट यांत
जे वाद सुरु आहे हे आपण रोज बघतोय. याचाच हा एक राजकीय भाग आहे की गुन्हे दाखल
केले जात आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.
हर हर महादेव सिनेमाच्यावेळी सुद्धा मारहाण प्रकरणी देखील जो गुन्हा
दाखल केला गेला. तो देखील राजकीय हेतूने केला गेला. राजकीय विरोधकांकडून दबाव
टाकून हे सर्व केलं जात आहे. मला जेलच्या आत टाकण्यात काहीच कारण नाहीये कारण मी
काय गुन्हेगार नाही. गुन्ह्यांतील काही रिकव्हरी करणे बाकी नाही. त्यामुळे माझ्या
अटकेची गरज नाही. मी मुंब्राच्या आमदार आहे मी कधीही चौकशीला येवू शकतो, असा युक्तिवाद चव्हाण यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा