जागर न्यूज : बिबट्या दिसला तरी अंगावर घाम सुटतो पण बिबट्या घरात घुसल्यावर काय परिस्थिती होते हेच एका गावात अनुभवायला मिळाले आहे.
बिबट्या आला अशा केवळ कल्पनेने देखील माणूस घामाघूम होऊ लागला आहे. अलीकडे बिबट्या कधी आणि कुठे दिसेल याचा काही भरवसा राहिलेला नाही. बिबट्या पाहण्यासाठी आता कुठे जंगलात जाण्याची गरज उरली नसून बिबट्याच आता माणसांच्या परिसरात येऊ लागला आहे आणि बिनधास्त वावरू देखील लागला आहे, बिबट्या घराजवळ येवून काही जणांना उचलून नेत त्यांची शिकार केल्याच्या काही घटना ताज्याच आहेत. बिबट्या आता बिनधास्त माणसांच्या प्रदेशात देखील येत असून झोपडीत आई वडिलांच्या कुशीत झोपलेल्या मुलाला देखील उचलून नेण्याचे प्रकार नुकतेच घडले आहेत. आता पुनः जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी-रायकर मळा येथील विलास रायकर यांच्या घरात रात्री आठच्या सुमारास बिबट्या घुसला. घरातील सदस्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली व पुढील अनर्थ टळला.
रायकर यांच्या घराच्या उंबऱ्यावर मांजर बसले असता त्याची शिकार करण्यासाठी हा बिबट्या तेथे आला बिबट्याला पाहून मांजर घाबरले व ते आत पळाले. त्यामुळे बिबट्याही त्याच्या दिशेने आला. बिबट्याला पाहून घरातील सदस्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या तेथून निघून गेला. या घटनेमुळे घरातील सदस्य भयभीत झाले. येथे बिबट्यास पकडण्यासाठी लवकरात लवकर पिंजरा लावावा, अशी मागणी विनोद रायकर यांनी केली.
जुन्नर तालुक्यातील बिबट-मानव संघर्ष हा सतत सुरू आहे. सध्या या प्रकारच्या घटना सतत घडताना दिसून येत आहेत. त्यातून शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.
हा प्रकार असाच सुरू राहिले व लवकरात लवकर योग्य ते उपाय न केल्यास भविष्यात बिबट व मानवातील संघर्ष वाढू शकतो. त्यासाठी वनविभागाने गावोगावी जाऊन जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच, वाड्यावस्त्यांवर जाऊन देखील नागरिकांना बिबट्यापासून बचावासाठी काय केले पाहिजे, याच्या कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. (Huge panic after leopard entered the house) सध्या ही जागृती करण्याचे काम कमी झाल्याचे नागरिक सांगत आहेत. आज घराच्या उंबऱ्यापर्यंत आलेला बिबट्या हा भविष्यातील संघर्षाची जाणीव करून देत असून, यावर लवकर उपाय शोधला पाहिजे अशी मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा