श्रद्धा वालकर या तरुणीचे ३५ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज एकेक अवयव पिशवीतून नेऊन फेकून देत राहिल्याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून हे प्रकरण रोज चर्चेत आहे. अत्यंत निर्दयीपणे हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा झालेला प्रयत्न प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणत आहे . या प्रकरणात रोज नवी आणि तितकीच धक्कादायक माहिती समोर येत असून देशभरात या घटनेचा प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आफताब पूनावाला याला अटक केली असली तरी आता त्याच्याही जीवाला धोका असल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यातच तलवारीने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या डोळ्यादेखत झाला असून पोलिसांना हवेत गोळीबार करण्याची वेळ आली.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालावर दिल्ली इथं तलवारीनं हत्या करण्याचा प्रयत्न झाला. पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबला पोलीस व्हॅनमधून नेलं जात होतं. त्यावेळी किमान दोन जणांनी नंग्या तलवारी घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तात्काळ मध्ये येत व्हॅनचं दार लावून घेतलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांचा प्रतिक्रार केला. (Attempted attack on Aftab who brutally murdered Shraddha) हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हल्लेखोरांनी आपण हिंदूसेना नावाच्या संघटनेचे सदस्य आहोत, असा दावा केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आफताबला काल पॉलिग्राफ चाचणीसाठी दिल्लीतील रोहिणी भागातील ‘एफएसएल’ कार्यालयात आणण्यात आलं. चाचणीनंतर सायंकाळी पोलीस आफताबला पुन्हा तिहार कारागृहात घेऊन जाण्यासाठी निघाले असता, हातात तलवारी घेऊन आलेल्या तरुणांनी आफताबवर तलवारीनं वार करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा तरुणांना रोखण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्यानं बंदूक काढत हवेत गोळी झाडण्याचा इशारा दिला.तरीही तरुणांनी पोलीस व्हॅनवर वार करणं सुरूच ठेवलं. अखेर चालकानं पोलीस व्हॅन पुढं नेली.
खुनी आफताबवर हल्ल्याचा प्रयत्न करणारा तरुण हे हिंदू सेनेचे असल्याचं सांगण्यात येतं. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आफताबला दोन मिनिटे पोलीस व्हॅन बाहेर काढा. आम्ही त्याला मारून टाकू. तलवारीनं हल्लाच काय, आम्ही त्याला गोळ्याही घालू. माझे नाव कुलदीप ठाकूर असून हिंदू सेनेचा राजाध्यक्ष आहे, असं एका तरुणानं सांगितलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा