उजनीतून ९० हजार क्युसेक्स विसर्ग !
जागर न्यूज : संशयास्पद मृत्यू झालेल्या महंत नरेंद्र गिरी यांच्या खोलीतून कोट्यावधीचे घबाड सीबीआय पथकाला सापडले असून अधिकारी याची मोजदाद करीत आहेत.
साधूसंत आणि फकीर यांची झोळी रिकामी असते, भिक्षा मागून ते आपला उदर निर्वाह करीत असतात असा एक सर्वसाधारण समज आहे. अधिकाऱ्यांच्या घरात कोत्यावाधीचे घबाड मिळते पण प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या खोलीतून ३ कोटी रुपये रोख रक्कम आणि काही जमिनीची कागदपत्रे सीबीआयने जप्त केली आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात सोनेनाणे देखील आढळून आले आहे. खोलीतून सापडलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद तयार करण्यात आली.
महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास करत असलेले सीबीआयचे पथकाला काल (गुरुवारी) प्रयागराज येथील बागंबरी मठात पोहोचले होते. त्यानंतर त्यांना दागिने, काडतुसं सापडले. सापडलेले सोनं, पैसे, कागदपत्रे जे महंत बलवीर गिरी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. सीबीआयने याची व्हिडीओग्राफी आणि फोटोग्राफी केली आहे. हा कक्ष आता मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पण, ज्या खोलीत महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह लटकलेला आढळला, ती खोली अद्याप उघडलेली नाही.
मठातील महंत नरेंद्र गिरी यांची खोली उघडण्यासाठी सीबीआय आणि पोलिस प्रशासनाचे पथक दाखल झाले आणि त्यांनी यावेळी मठाचे सर्व दरवाजे आतून बंद केले होते. कोणालाही आत येऊ दिले जात नव्हते. वरच्या मजल्यावर जिथे खोली उघडली होती तिथे जाण्याची परवानगी नव्हती. नरेंद्र गिरी यांची सील केलेली खोली सीबीआय पथक, पोलीस आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. महंत गिरी यांची खोली सुरू उघडण्यासाठी बाघंब्री मठाचे विद्यमान महंत बलवीर गिरी यांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयच्या पथकाने पोलीस आणि दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडली. प्रयागराज पोलिसांनी महंताच्या संशयास्पद मृत्यूनंतर मठातील दोन खोल्या सील केल्या होत्या.
सदर खोलीतून तीन कोटी रुपये, हनुमानजींचं सोन्याचं मुकूट, ५० किलो सोनं, काही दागिने, जमिनीची कागदपत्रे, १३ काडतुसं आणि सुमारे ९ क्विंटल देशी तूप सापडले आहे. साधू महंत यांच्याकडे एवढी मोठी मालमत्ता पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा