जागर न्यूज : पोलीस मुख्यालयाच्या गेट समोरच एका पोलीस कर्मचाऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला आहे.
अलीकडे हत्या, मारामारी असे गुन्हे वाढले असून गुंड, गुन्हेगार यांच्यात हे प्रकार अधिक आहेत पण पोलीस मुख्यालयाच्या गेटवर येवून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्याचे धाडस काही आरोपींनी केले आहे. यवतमाळ पोलीस मुख्यालयाच्या गेटवर ही घटना घडली असून पोलीस देखील या प्रकाराने हादरले आहेत. जुन्या वादातून ही घटना घडली असून हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने वार करण्यात आले. निशांत खडसे हे पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयातील पोलीस बँड पथकात निशांत खडसे कार्यरत आहेत. ते याच पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस वसाहतीमध्ये राहत होते आणि मुख्यालयाच्या गेटवर त्यांचावर हल्ला करण्यात आला. यात ते गतप्राण झाले आहेत.
पोलीस कर्मचारी निशांत खडसे यांनी काल यांनी अंगणवाडी सेविकांच्या मोर्चात बंदोबस्ताचे कर्तव्य बजावले. त्यानंतर थेट पोलीस मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या एक बारमध्ये गेले. तिथून मद्यप्राशन करून ते मुख्यालय परिसरातील आपल्या घरी परतत होते. त्याच वेळी आधीच दबा धरून बसलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने हल्ला केला.हे हल्लेखोर निशांतचे रोजचे मित्र होते. आरोपी कुंदन मेश्राम, अभिषेक बोंडे रोज निशांतला भेटणारे मित्र होते. या तिघांमध्ये चांगली मैत्री होती. मात्र निशांत हा मुख्य आरोपी असलेल्या अभिषेक बोंडे याला हीन दर्जाची वागणूक देत होता. त्याला क्षुल्लक कारणावरून मारहाण करत होता. वेळोवेळी अपमान करत होता. ही सल अभिषेकच्या मनात सलत होती. त्याचमुळे निशांतचा काटा काढायचा ठरवले.
नेहमीप्रमाणे निशांतला आपल्या कट्ट्यावर बोलवले. हे तिघेही शिवनाथ बारमध्ये मद्यप्राशन करण्यास गेले. तिथं दारू पिल्यानंतर त्यांनी दुसऱ्या बारमध्ये मोर्चा वळविला. पुन्हा त्या ठिकाणी दारू पिल्यानंतर मुख्य आरोपी अभिषेक बोंडे हा सर्वात आधी वसाहतीकडे गेला.हॉकी स्टिक, रॉड वसाहतीच्या या गेटजवळ आणून ठेवले होते. निशांतची वाट पाहत होता. निशांत गेटजवळ येताच त्याच्याशी मुद्दाम वाद घातला. तयारीनिशी असलेल्या अभिषेकने निशांतवर हल्ला चढविला. या हल्ल्यात निशांत हा जागीच ठार झाला. निशांतचा मृतदेह तिथं पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा