जागर न्यूज : आत्महत्या करण्याचे संकेत देत एक पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
परभणीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या करावी वाटते असं स्टेटस ठेवल्याने आणि नंतर तो कर्मचारी गायब झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षकासोबत कामावरून वाद झाल्यानंतर अपमानित झाल्याची भावना या कर्मचाऱ्याच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर 'आपल्याला आत्महत्येसारखे पाऊल उचलावं वाटतंय' असं व्हाट्सअप स्टेटस ठेवून पोलिस कर्मचारी गायब झाला आहे. या पोलिस कर्मचाऱ्याचा शोध घेतला जात आहे. आत्महत्येच्या घटनात अलीकडे वाढ तर झालीच आहे आणि आत्महत्येचे चित्रीकरण मोबाईलवर करीत आत्महत्या होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लाइव्ह आत्महत्या करण्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत. एका पोलिसाने मात्र आत्महत्या करण्याचे संकेत देणारे स्टेटस ठेवून पोलीस कर्मचारी गायब झाला आहे.
आमच्यात वाद नाही !
नवरात्रीमुळे सर्वत्र बंदोबस्त लावण्यात आला आहे, पाथरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी मानवत येथे बंदोबस्तासाठी गेलेले आहेत. त्यामुळे आज सकाळी पाथरीत तिरंगा रॅली निघाली. त्याची माहिती आणि स्टेशन डायरीत बंदोबस्त नोंद घेण्याबाबत मी त्यांना सांगितले. मात्र त्यांनी त्यालाच अवघड मानलं आणि असे केले. परंतु आमच्यात वाद झाला नाही. ते येतील, आम्ही त्यांना शोधतोय अशी प्रतिक्रिया पाथरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा