जागर न्यूज : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून भयंकर घटना याच मार्गावर घडली आहे, तब्बल नऊ वाहने एकमेकांना धडकून मोठा अपघात झाला परंतु सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.
सगळ्याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत परंतु पुणे- मुंबई हा एक्स्प्रेस मार्ग अपघाताचाच नव्हे तर मृत्युचाच महामार्ग बनला आहे. सतत या मार्गावर अपघात होत असून निरपराध प्रवाशांचे बळी या अपघातात जात आहेत. अलीकडे तर या मार्गावर सतत वाहतुकीची कोंडी आणि अपघात होतच आहेत परंतु यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. आता पुन्हा अत्यंत भयंकर घटना घडली असून तब्बल ९ वाहने परस्परांना धडकली आहेत. (Nine vehicles hit each other at the same time!) ही घटना घडली तेंव्हा येथे प्रचंड गोंधळ उडाला परंतु सुदैवाने या भयंकर वाटणाऱ्या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.
मुंबई - पुणे महामार्गावर खोपोलीजवळील बोरघाटात मुंबई लेनवरती ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि या ट्रकने एसटी बससह इतर ७ कारना धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक कोंडी सुरळीत केली आहे. बोरघाटात आज झालेल्या अपघातामध्ये तब्बल ९ वाहने एकमेकांना धडकली असून या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झालेल्या वाहनामंध्ये एक ट्रक, एसटी बस आणि ७ कारचा समावेश असून या भयानक अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा