तुळजाभवानी मंदिरात भाविकांप्रमाणेच पुजाऱ्यांसाठीदेखील काही नियम घालून देण्यात आले आहेत. मंदिरात गोंधळ उडू नये, कायदा सुव्यवस्था टिकून राहावी आणि सर्वांना न्याय्य पद्धतीनं दर्शनाचा लाभ मिळावा, या उद्देशानं हे नियम आखण्यात आले आहेत. कुठल्याही पुजाऱ्याला मंदिरात काम करण्यापूर्वी या नियमांची कल्पना देण्यात आलेली असते् आणि त्या नियमांचं पालन पुजाऱ्यांनी करणं गरजेचं असतं. मात्र काही पुजाऱ्यांनी या नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी थेट प्रवेशबंदीची कारवाई केल्यामुळे मंदिराच्या पुजाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यात एकाचवेळी 11 पुजाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या ११ पुजाऱ्यांपैकी प्रत्येकावर कमीत कमी एक महिना ते जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठीची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेऊन ही कारवाई आहे. या कारवाईसोबतच प्रत्येक पुजाऱ्याला एक नोटिसही पाठवण्यात आली आहे. आपल्यावर सहा महिने प्रवेशबंदीची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा या नोटिशीतून करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी यांनी केलेल्या या कारवाईमुळे खळबळ तर उडालीच आहे पण अन्य पुजारी मंडळीनी देखील या कारवाईचा धसका घेतला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा