पंढरपूर : पंढरीतील भर चौकात असलेल्या महावितरणच्या रोहीत्राने अचानक पेट घेतला आणि काही क्षणात आग भडकली पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
महावितरणचे रोहित्रे रस्त्यावर, चौकात कुठेही असतात आणि विशेष म्हणजे ती बेवारस असल्यासारखी त्यांची अवस्था असते.रोहित्राच्या खांबावर लावलेली फ्युजची पेटी बहुतेकवेळा सताड उघडी असते आणि आतल्या फुटलेल्या फुयुज सतत दर्शन देत असतात. परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला की स्वयंघोषित वायरमन धावत तेथे जातात आणि फ्युज तपासत असतात. कुणी मनोरुग्ण येथे गेला तर काहींही अनर्थ होऊ शकतो पण या पेट्यांची दुरवस्था कधीच संपत नाही. महावितरण कंपनीला हे माहित नाही असेही नाही पण याकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष केले जाते आणि मग या दुर्लक्षाचा फटका कुणालाही बसू शकतो.
अशाच काहीशा बेफिकीर्मुळे सांगोला चौकात, दाट लोकवस्तीच्या परिसरात आणि वर्दळीच्या भागात एका रोहीत्राला अचानक आग लागली. काही वेळेतच ही आग अधिक भडकली. ही आग पाहून परिसरातील लोक तेथे जमले. आग लागलेल्या डीपी जवळच नागरिकांची घरे आहेत आणि नागरिकांनी येथे कपडेही वळायला टाकलेले होते. या आगीमुळे हे कपडे जळून गेले. नागरी भागात हा डीपी असल्याने जवळच लहान मुलेही खेळत असतात पण सुदैवाने काही अनुचित घडले नाही. सुरुवातीला थोडीशी लागलेली आग नंतर अधिक भडकत वाळत घातलेल्या कपड्यापर्यंत गेली आणि या कपड्यानीही पेट घेतला. ही आग वाढू लागल्यानंतर स्फोटासारखा मोठा आवाजही झाला आणि परिसरातील लोक घाबरून गेले.
विद्युत विषय असल्याने त्यावर पाणी मारणे हे देखील धोक्याचे असत त्यामुळे सुरुवातील नागरिक गोंधळून गेले. आग अधिकच उग्र स्वरूप धारण करीत असल्याचे पाहून तेथील नागरिक घाबरून गेले आणि रस्त्यावर बघ्यांची गर्दीही जमली. काही जागरूक नागरिकांनी तातडीने अग्निशामक दलाला या आगीची माहिती दिली. अग्निशामक दल तातडीने तयारीसह येथे पोहोचले आणि त्यांनी आग विझवायला सुरुवात केली. अखेर ही आग परिसरातील घरांपर्यंत जाण्याआधीच विझविण्यात यश आले. यापूर्वीही प्रदक्षिणा मार्गावर भर पावसात एका डीपी ने पेट घेतला होता त्याची आठवण नागरिकांना आली. अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी महावितरणने सुरक्षेची दक्षता घेण्याची गरज आहे. संकट प्रत्येकवेळीच अंतरावरून जाईल हे सांगता येत नाही. काही अनुचित घटना घडल्यानंतरच महावितरण जागे होणार काय ? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
खालील बातमीवर क्लिक करा :
हे देखील वाचा : चमत्कार लसीचा ! मुका पुन्हा बोलू लागला !
हे वाचाच :> भैया देशमुख यांनी घेतली पोलीस निरीक्षकाची 'विकेट' !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा