सोलापूर : वीज बिल वसुलीसाठी येणाऱ्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी यांना आता झटके बसणार असून त्यांना आता जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराच आज शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे.
राज्याचे महावितरण मोठ्या आर्थिक संकटात असून कोट्यावधींची रक्कम ग्राहकाकडे थकलेली आहे त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महावितरणने वीज बिल वसुलीची धडक मोहीमच राबवायला सुरुवात केली आहे त्यामुळे ग्राहकात नाराजी पसरली आहे. वीज ग्राहक आणि महावितरण अधिकारी, कर्मचारी यांच्या अनेक ठिकाणी संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकारही घडले आहेत. शेतकरी बांधवाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या प्रकारामुळे तर शेतकरी प्रचंड अडचणीत येत आहे पण आज शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी महावितरणला खुले आव्हानच दिले आहे.
शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट न करण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे पाटील यांनी सांगितले आणि महावितरणाला आव्हान दिले शेतकऱ्यांचे विजेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वीज कनेक्शन तोडणे , डीपी बंद करणे , डांबाच्या फिजा काढून नेंहणे याविरोधात रघुनाथ पाटील यांनी लढा उभा करण्याचा निर्धार केला आहे. "एम एस ई बी चे आम्ही देणे लागत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने तशी ऑर्डर केलेली आहे. तरीही एम एस सी बी चा आगाऊपणा सुरू असून त्या विरोधात संघर्ष उभा करत असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिली.
वीज बिलांच्या वसुलीसाठी येणाऱ्या महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता झटके बसणार आहेत. त्यांना जशाच्या तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा देखील यावेळी शेतकरी संघटना नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे. काही शेतकरी संघटनेचे लोक शेतकऱ्यांना महावितरणचे पैसे भरायला लावतात, ते शेतकरी विरोधी आहेत आणि राजकीय पक्षाचे गुलाम झालेले आहेत. काही संघटना भाजपने पाळलेल्या आहेत. त्यांनी आमदार केलेले आहेत. काही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि काही शिवसेनेने पाळलेल्या संघटना आहेत. कोण आज शेतकऱ्याच्या बरोबर आहेत हे शेतकऱ्यांनी ओळखले पाहिजे. शेतकरी संभ्रमित झाले आहेत. त्यामुळे कुणाच्या मागे जावे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा