मुंबई : गेल्या आठवड्यापासून अधिक वाढलेला थंडीचा कडाका आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
यावर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीपासून थंडी कमीच होती आणि हिवाळ्याच्या दिवसात पावसाला अनुभवायला मिळाला होता. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस थंडीचे वातावरण अधिक जाणवू लागले पण नव्या वर्षात तापमान झपाट्याने कमी होत गेले आणि गारठा वाढला. गेल्या चार पाच दिवसात पुन्हा तापमान आणखी कमी झाले असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी पडलेली आहे. किमान तापमानात १० अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली गेले होते त्यात आता किंचित वाढ झालेली आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यात थंडी कायम असणार आहे. नंतर मात्र ३ ते ५ अंशापर्यंत तपमानात वाढ होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील सात दिवस उत्तर भारतात थंडीची लाट येणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.
बाबा, खूप खूप शुभेच्छा !
आवारे, काटे, लोकरे, ताकपिरे,
ओहोळ, चंदनशिवे परिवार
----------------
मागील चार दिवसांपासून उत्तर भारतात अनके ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आणि यातच पाऊस होत आहे, यातच बर्फवृष्टी होताना दिसत आहे. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहणार आहे. दरम्यान देशात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. येत्या काही दिवसांत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे. सध्या वायव्य आणि मध्य भारतावर २ सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तयार झाले आहेत. त्यामुळे ९ जानेवारीपर्यंत वायव्य आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसासह बर्फवृष्टीची शक्यता सांगण्यात आली आहे. ७ जानेवारीला पंजाब, पूर्व-उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तर ७ आणि ८ जानेवारीला पूर्व मध्य प्रदेशात गारपिटीसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय पुढील सहा ते सात दिवस उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता नसल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा