जागर न्यूज : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपणास माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे घर जाळण्यास सांगितले होते असा धक्कादायक आणि खळबळजनक गौप्यस्फोट शिवसेनेच्याच एका आमदाराने केला आहे.
शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. ते म्हणाले की, आमदारकीची उमेदवारी मिळावी यासाठी मला मनोहर जोशींनी 'मातोश्री'वर ताकद दाखवायला सांगितलं. पण नंतर माझी उमेदवारी कापली. जोशी सरांच्या घरावर हल्ला करण्याचा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकरांनी दिला होता, असं ते म्हणाले. ज्यावेळी मला उमेदवारी नाकारली तेव्हा मी मनोहर जोशींना काय करु, असं विचारलं. ते म्हणाले, सदा तुला तुझी ताकद दाखवावी लागले.. 'मातोश्री'वर शिवसैनिकांना घेऊन जा. मग मी 'मातोश्री'वर गेलो. उद्धव ठाकरे बसलेले होते. ते म्हणाले, मला वाटतंय तूच निवडून येऊ शकतो. तूच आमचा उमेदवार. पण करणार काय? तुला उमेदवारी नाही देऊ शकत अन् कारणही नाही सांगू शकत.
उद्धव ठाकरे तिथून निघून गेले. मिलिंद नार्वेकर तिथं होते. त्यांना एक फोन आला. फोनवर बोलणं झाल्यानंतर नार्वेकर म्हणाले, तुमचं तिकिट मनोहर जोशींनी कापलेलं आहे. त्यामुळे हे शिवसैनिक जोशींच्या घरी घेऊन जा. मग मी जोशी सरांच्या घराकडे निघालो. थोडं पुढे गेलो असेल तर संजय राऊतांचा फोन आला. मला म्हणाले कुठे चालले? त्यांना कशाला सांगायचं त्यामुळे मी उडवाउडवीची उत्तरं दिली. सेना भवनाला चाललो वगैरे... ते म्हणाले, तू मनोहर जोशींच्या घरी चालला आहेस ना, मोर्चा घेऊन. मग तू असाच जाऊ नकोस. पेट्रोल घेऊन जा, जाळून टाक त्यांचं घर.. काही शिल्लक ठेवू नकोस. असे सांगितल्याचे सरवणकर यांनी सांगितले आहे.
'मातोश्री'चा आदेश हा अंतिम असतो. त्यामुळे मी मनोहर जोशींच्या घरी निघालो. तेराव्या माळ्यावर शिवसैनिक चालत गेले. मात्र तिथे पंधरा ते वीस शिवसैनिक होते, जे कधीच नसतात.. घराच्या आजूबाजूला काही व्हिडीओ कॅमेरे घेऊन लोक उभे होते. चॅनेलचेही लोक होते. तरीही आम्ही आदेश पाळायचा म्हणून जे पुढे गेलो. त्यानंतर जी घटना घडली ती सर्वांनाच माहिती आहे.'' ही घटना सांगून आमदार सदा सरवणकर यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. (Shiv Sena MLA's secret blast उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळण्याचे आदेश दिले होते, असं सरवणकरांनी सांगितलं. याबाबत अद्याप ठाकरे गटाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. या आरोपामुळे मात्र राजकारणात एक वेगळीच खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा