जागर न्यूज : आपले शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर चप्पल भिरकावून, पोलिसांचे पाय काढण्याची धमकी देखील देण्याचा एक धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडला आहे. पोटगीच्या दाव्यातील न्यायालयीन वॉरंट बजावणी करण्यासाठी पोलीस गेलेले असताना ही घटना घडली.
न्यायालयातील प्रकरणी न्यायालयाचे समन्स अथवा वॉरंट संबंधिताना बजावणे हे पोलिसांचे काम असते आणि त्यासाठी पोलीस कर्मचारी संबंधित व्यक्तीच्या घरी पोहोचत असतात. पोलिसांचे ते कामच आहे पण हेच काम करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना सांगोला तालुक्यात एक वेगळाच अनुभव घ्यावा लागला आहे . पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ तर करण्यात आलीच पण धमकी देखील देण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.आरोपीच्या नातेवाइकांसह अनोळखी महिलांनी पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की केली. सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील लक्ष्मण पवार यांच्या घराजवळ घडली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल गणेश मेटकरी यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रवीण मोहन पवार, लक्ष्मण दत्तू पवार, धनाजी गणपत पवार (तिघेही रा. वाटंबरे), बंडू विश्वास आवताडे (रा. तांदुळवाडी ता. माळशिरस) यांच्यासह दोन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल केला.
पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश मेटकरी व पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिल निंबाळकर असे दोघे मिळून युनिफॉर्मवर माळशिरस कोर्टाकडील पोटगीची रक्कम वसुली करण्याकामी चौकशी अर्ज वॉरंटमधील सीताराम ज्ञानू पवार ( वाटंबरे) यास वॉरंटची बजावणी करण्याकामी शनिवारी रात्री निघाले होते. त्यावेळी वाटेत लक्ष्मण पवार यांनी पोलिसांना तुम्ही इकडे का आला आहात अशी विचारणा करीत आमच्या घराकडे येण्याची गरज नाही, तुझे वॉरंट बिरंट गेले खड्डयात असे म्हणून चला निघा येथून असे म्हणाला. (Policemen on duty were threatened,) त्यावेळी त्यांच्या घरातून तिघेजण शिवीगाळ करीत बाहेर आले. त्यावेळी त्या तिघांनी पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. प्रवीण पवार याने त्याच्या पायातील चप्पल काढून पोलिस हेडकॉन्स्टेबल निंबाळकर यांच्या दिशेने भिरकावली. तुम्ही तिकडे अजिबात जायचे नाही. जाण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या दोघांचे पाय गुडघ्यातून काढून मोडून टाकू असे धमकावल्याची फिर्याद दिली आहे.
पोलिसांना धमकावण्याचे आणि त्यांचे पाय गुडघ्यापासून काढण्याची धमकी दिल्याचे हे प्रकरण सांगोला तालुक्यात खळबळ उडवून देणारे आणि चर्चा घडवणारे ठरले आहे. पोलीस आपले काम करीत असताना झालेला हा प्रकार धक्कादायक मानला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा