जागर न्यूज : ग्रामपंचायतीच्या उदासीनतेला कंटाळून एका व्यापाऱ्याने भर रस्त्यावर स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना, करमाळा तालुक्यातील केम येथे घडली आहे. अनेकदा ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देखील दुर्लक्ष होत असल्यामुळे या दुकानदाराने हा प्रकार केला आहे.
करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या केम येथील बाजारपेठेत, तरुणाच्या रस्ता अडवून थांबण्यामुळे आणि ग्राम पंचायत डोळेझाक करीत असल्याने व्यथित झालेल्या तरुण दुकानदाराने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.गौरी गणपतीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाजी मंडई भरलेली होती; ती रोजच मोठ्या प्रमाणात भरते. परंतु या मंडळींना मोकळी अशी जागा नसल्यामुळे चालू दुकानासमोरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून दुकानदार आपला भाजीपाला - माल विकतात. अशा या मोठ्या बाजारपेठेमध्ये देवीका लेडीज शॉपी दुकान आहे. सण उत्सवामुळे या दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. परंतु दुकानात जाण्यासाठी येण्यासाठी वाटच न - ठेवल्यामुळे व मेन चौकामध्ये मोटारसायकली, चारचाकी वाहने लावून नागरिक कुठेतरी फिरायला जातात. त्यातच, चौकातच विनाकारण थांबलेले तरुण असतात. या तरुणांच्या गर्दीमुळे महिला दुकानाकडे फिरकत नाहीत. ऐन सणाचा कालावधी असताना देखील महिला ग्राहक दुकानाकडे यायला तयार नसतात. याला दुकानदार अशोक ओस्तवाल हे वैतागले होते.
दुकानदाराला कोणालाही काही न बोलता याचा स्वतःला त्रास देण्याचे ठरविले आणि स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे जवळपास असलेले लोक धावत पुढे आले मदतीला धावलेल्या लोकांनी ओस्तवाल यांचा जीव वाचवला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. रस्त्यावर थांबणारे टवाळखोर सगळ्याच दृष्टीने रस्त्यावर अडथळा असतात पण गावागावातील चौकात अशी मंडळी थिल्लरपणा करीत उभी असल्याचे दिसते. केम येथे मात्र एक व्यापारीच वैतागला आणि त्याने आपल्या जीवाचा शेवट करून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे केम परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच केम पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ओस्तवाल यांच्याकडे विचारपूस केली. यावेळी त्यांच्या या कृत्यामागे त्यांचा लपलेला संताप बाहेर आला.
सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत. महिला वर्गांना मोठ्या प्रमाणात खरेदी करायची असते. परंतु ग्राहकांना दुकानात येण्यासाठी वाट नसेल तर कुठून येणार? तसेच दुकानासमोर संपूर्ण अतिक्रमण केलेले आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायतला सांगून, लेखी अर्ज देऊनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून मी स्वतःच प्रायश्चित्त घेत आहे. इथून पुढे जर अतिक्रमण निघाले नाही तर मी परत स्वतः आत्मदहन करेन, असे अशोक ओस्तवाल यांनी सांगितले (Neglect of Gram Panchayat, attempt to burn on the road) तसेच भविष्यात होणाऱ्या सर्व घटनेला ग्रामपंचायतला जबाबदार धरण्यात यावे असे देखील त्यांनी सांगितले आहे. या घटनेने केम परिसर आणि करमाळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा