जागर न्यूज : पंढरपूर तालुक्यातील एक ग्रामपंचायत सदस्य थेट पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचले असून त्यांनी ग्रामीण भागातील विविध समस्यांची चर्चा देखील मोदी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे या सदस्याचे विशेष कौतुक होऊ लागले आहे.
हल्ली ग्रामपंचायत सदस्य म्हणजे केवळ नामधारी आणि मतदारांशी प्रतारणा करणारच असतों असे अनेकांच्या बाबतीत दिसून येत तर. काही जण केवळ निवडून आलो यातच धन्यता मानतात. कुणी आपल्या स्थानिक नेत्यांच्या आदेश पालन करण्यासाठीच पाच वर्षे घालवतात तर कुणी काही मलिदा मिळतोय काय ? यासाठीच झगडत असतात. ज्या मतदाराच्या जीवावर आपण सदस्य म्हणून निवडून आलो, त्यांच्याशी पुढे कसलेही देणेघेणे न ठेवणारे ग्रामपंचायत सदस्य देखील अनेक गावात दिसून येतात. मतदारांच्या समस्या सोडविण्याचे आपले काही कर्तव्य आहे याचे स्मरण नव्हे, तर जाणीव देखील अनेकांना नसते. अर्थात ते पुढच्या वेळी निवडून येतही नसतात पण नागरिकांना पाच वर्षे शिक्षा मात्र भोगावी लागते. अशा काळात पंढरपूर तालुक्यातील एक ग्रामपंचायत सदस्य थेट देशाच्या पंतप्रधानांपर्यंत धडकला आणि त्याने ग्रामीण भागातील जनतेच्या व्यथा मांडल्या आहेत.
पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे ग्रामपंचायतचे सदस्य विकास पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान ग्रामीण भागातील विविध विषयांवर पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केलीपंतप्रधान यांची भेट व्हावी; यासाठी अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी नेहमीच उत्सुक असतात. अनेक वेळा पंतप्रधानांच्या व्यस्त दौऱ्यामुळे त्यांची भेट होणे अशक्य होते. व्य (Grampanchayat members of Pandharpur taluka reached Modi) स्त कार्यक्रम आणि दौऱ्यातून ही पंतप्रधान मोदी यांनी विकासपवार यांना भेटीसाठी वेळ दिली.
त्यानुसार सोमवारी दुपारी संसद भवनामध्ये त्यांच्यामध्ये भेट झाली. भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्याशी ग्रामीण भागातील विविध विषयांवर चर्चा केली.काही अडचणी आल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधण्याचे ही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज आणि शेती कर्ज पुरवठा या विषयी ही त्यांनी माहिती जाणून घेतल्याचे विकास पवार यांनी सांगितले. एका सर्व सामान्य सदस्याला पंतप्रधानांनी भेट दिल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच पवार यांचे देखील कौतुक होऊ लागले आहे. नुसतेच मिरवणारे ग्रामपंचायत सदस्य कुठे आणि मोदी यांच्यापर्यंत भिडणारे हे सदस्य कुठे ? अशी चर्चाही पंढरपूर तालुक्यात होऊ लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा