जागर न्यूज : विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह चार जणांनी ट्रॅक्टरला बांधून कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली असून शिंदे यांच्यासह चार जणांच्या विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील एकाला लहान ट्रॅक्टरला बांधून . मारहाण करण्यात आली आहे. त्याचबरोबर काठी, केबल, वायरने मारहाण केल्याप्रकरणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्यावर व इतर चारजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, तांदूळवाडी (ता. माळशिरस) येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गणेश दत्तराज ताड (वय १८, रा. भाळवणी, ता. पंढरपूर) व तौफीक शेख हे दोघे ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास चालले होते. यादरम्यान पंढरपूर ते सातारा रोडवर जाभूळबेट दर्गाजवळ आले असता रोडवर तेजस गवळी व शुभम गायकवाड यांनी त्यांना थांबवले.
तेजस गवळी याने मागील सुमारे ६ महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा रोष मनात धरून कोयत्याने ताडच्या डोक्यात मारले. तसेच केबल वायरने मारले. त्यानंतर मोटारसायकलवरून डॉ. विजय गवळी यांचे गुरांचे शेडवर नेले. (A youth was stabbed in Pandharpur taluka) तेथे असलेल्या दाव्याला बांधून केबल वायरने पुन्हा पाठीवर, दोन्ही पायांना व शरीरावर मारले. तसचे ताड यांना अडकवून तेथे असलेल्या संभाजी शिंदे, अर्जुन गवळी, डॉ. विजय गवळी (सर्व रा. भाळवणी, ता. पंढरपूर) यांनी मारहाण केली. तसेच तेथे असलेल्या लहान ट्रॅक्टरला बांधून मारहाण करत ओढत नेल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा