उप अधीक्षक भूमि अभिलेख तासगाव, जिल्हा सांगली या कार्यालयात दिनांक १८/०८/२०२३ रोजी कार्यालयीन वेळेत शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) तालुकाप्रमुख प्रदीप माने व इतर यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख तासगाव या कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक चंद्रकांत शिरढोणे व शिपाई दत्तात्रय जगताप यांना मारहाण केलेली आहे. प्रदीप माने यांनी मारहाण करीत असतानाचा केलेला व्हिडिओ सर्वत्र प्रसिद्ध केलेला आहे तसेच सदर बातमी वृत्तपत्र मध्ये प्रसिद्ध केलेले आहे. त्यामुळे मारहाण झालेल्या कर्मचारी यांची बदनामी झालेले आहे व त्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाच्या आत्मसन्मानास ठेच पोहोचून सार्वजनिक जीवनात वावरताना खोट्या बदनामीला सामोरे जावे लागत असल्याने मानसिक धक्का बसलेला आहे तसेच तासगाव मधील घटनेची पुनरावृत्ती सोमवार नंतर उप अधीक्षक भूमी अभिलेख खानापूर मुक्काम विटा या कार्यालयातील कर्मचारी यांना चोप देवून करणार असल्याचा बातमीचा प्रचार प्रसार माध्यमामार्फत केला जात आहे.
सदर इसम प्रदीप माने हे वरील कार्यालयात यापूर्वी वारंवार येऊन मोबाईल द्वारे चित्रीकरण करणे कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे दमदाटी करणे यासारखे प्रकार वारंवार करत असतात त्यामुळे त्यामागे काही आर्थिक हेतू तर नाही ना अशी शंका येते. सदर इसम प्रदीप माने यांचे वैयक्तिक काम नसतानाही विनाकारण कार्यालयात अनधिकृत जमावसह प्रवेश करून दहशत निर्माण केलेली आहे. तसेच उप अधीक्षक भूमि अभिलेख तासगाव या कार्यालयात महिला कर्मचारी कार्यरत आहेत माने यांच्या दहशतीमुळे व मोबाईलद्वारे केलेल्या चित्रीकरणांमुळे महिला कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यालयातील उपलब्ध सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोजणी कामकाज दिले असल्याने सदर कर्मचारी मोजणी ठिकाणी जात असतात त्यामुळे कार्यालयात कर्मचारी गैरहजर आहेत असा होत नाही, वास्तविक आम्ही सर्व भूमि अभिलेख कर्मचारी विहित परिमाणापेक्षा जास्तीचे काम करत आहोत तसेच वेळोवेळी शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेचे प्रभावीपणे ग्रास रूटवर राबवण्याचे काम केले जाते. शासकीय सुट्टी दिवशी देखील कर्मचारी यांना विहित कामकाज पूर्ण करणे करिता काम करावे लागत आहे. शासकीय काम करताना कर्मचारी स्वतःच्या कुटुंबाला देखील वेळ देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे अशावेळी कर्मचाऱ्यांवर अप्रिय व हिंसक घटना घडत असल्याने कर्मचारी स्वतःचे मानसिक संतुलन बिघडून घेऊन त्याचे बाबतीत अनुचित प्रकार घडू शकतो, अशी भीती कर्मचारी संघटनेने व्यक्त केली आहे.
सदर घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील कर्मचारी तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी व त्यांचे कुटुंब यांचेमध्ये अस्वस्थता भीती व असुरक्षितता निर्माण झालेली आहे. त्यामुळे मोजणी करणारे कर्मचारी व यांचे मध्ये अस्वस्थता भीती व सुरक्षितता निर्माण झालेली आहे त्यामुळे मोजणी करणारे कर्मचारी व कार्यालयात काम करणारे कर्मचारी यांना संरक्षणाची ग्वाही मिळाले शिवाय कर्मचारी हे काम करणार नाहीत, अशी भूमिका विभागातील कर्मचारी यांनी घेतलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत गुन्हेगाराला अटक होत नाही व सुरक्षिततेची ग्वाही मिळत नाही तोपर्यंत पुणे विभागातील भूमी अभिलेखकर्मचारी संघटनेच्या वतीने भूमी अभिलेख विभागाचे काम बंद आंदोलन सोमवार दिनांक २१/०८/२०२३ पासून करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे निवेदन कर्मचारी संघटनेने आधीच दिले आहे. त्यानुसार आज त्यांनी आपले आंदोलन सुरु केले आहे. प्रविण ननवरे शिवदास शितोले विकास कुमठेकर नवनाथ राऊत मनोज सुतार, अक्षय यादव आणि अन्य कर्मचारी वृंद सहभागी झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा