जागर न्यूज : पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील एका कुटुंबाची मोठी फसवणूक करण्यात आली असून, एटीम कार्डाची बदलाबदल करून मोठ्या चलाखीने त्यांना दीड लाखांना फसविण्यात आल्याचे समोर आले आहे.
बँकांनी ग्राहकांच्या सोईसाठी एटीम मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत पण अनेकदा ही सुविधा अडचणीत आणताना दिसत आहे , अज्ञान आणि काहीशी बेपर्वाई यामुळे फसवणुकीच्या घटना वाढत असून, आजवर अनेकांची अशाच पद्धतीने फसवणूक झाली आहे. इटीएम कार्डाची अदलाबदल करून फसवणूक करण्याच्या अनेक घटना घडत असतानाही सावधगिरी बाळगली जात नाही आणि मग फसवणूक अटळ असते. अशाच प्रकारे पंढरपूर शहरात देखील फसवणूक करून दीड लाख रुपये लंपास करण्यात आले आहेत. (Fraud by swapping ATM cards)अनोळखी व्यक्तीने हालचलाखीने 'एटीएम' कार्डची अदलाबदल करून एकजणाच्या बँक खात्यातील १ लाख ४५ हजार रूपये काढून गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मी टाकळी येथील धोंडीराम भानुदास माने (वय ६१) आणि त्यांची पत्नी गोकुळा या दोघांचे स्टेट बँकेत संयुक्त खाते आहे. दि. १२ जुलै रोजी ते पंढरपूर शाखेतील 'एटीएम'च्या ठिकाणी गेले. तेथे पाठीमागील व्यक्तीच्या मदतीने त्यांनी आपल्या कार्डने खात्यातील १० हजार रूपये काढले. मात्र, त्या अनोळखी व्यक्तीने हालचलाखी करत तसेच दिसणारे दुसरे कार्ड माने यांना दिले... दरम्यान, २१ जुलै रोजी माने यांना त्यांचा मित्र नितीन वाघमारे हा उसने पैसे मागण्यास आला. त्यामुळे त्याला घेऊन ते 'एटीएम'च्या ठिकाणी गेले असता कार्डने पैसे निघाले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपले कार्ड पाहिले असता ते वेगळेच असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारानंतर माने यांनी बँकेत चौकशी केली असता दि.१२ ते १९ जुलै दरम्यान त्यांच्या खात्यातून १ लाख ४५ हजार रूपये काढून फसवणूक केली गेली असल्याचे समजले. त्यानंतर माने यांनी पोलिसात धाव घेतली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा