जागर न्यूज : चोरट्यांनी आता शेतातील फळबागांवर देखील डल्ला मारायला सुरुवात केली असून सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या डाळिंब बागेत लाखो रुपयांची चोरी झाल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोहोळ तालुक्यातील पोखरापूर इथं ही घटना घडली. झाडावर लगडलेले डाळिंबचोरल्यानं जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार या शेतकऱ्याच्या शेतात ही चोरीची घटना घडलीय.मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार यांनी स्वतःच्या शेतात अर्धा एकर डाळिंब आणि शेजारी असलेले दोन एकर शेत बटईने घेऊन त्यात डाळिंबाचे पीक घेतले होते. या दोन एकर बागेतील डाळिंब काढणीला आली होती.
चार पैसे गाठीला येण्याची वेळ जवळ आल्याने शेतकरी आनंदित होते मात्र, नऊ जुलैला रात्री अमृत पवार यांनी शेतातील डाळिंबाला पाणी दिले. पहाटे जेव्हा ते बागेत गेले तेव्हा डाळिंबाच्या झाडांना फळे दिसली नाहीत. म्हणून त्यांनी सगळीकडे पाहणी केली. त्यावेळी अडीच एकरावरील झाडांना डाळिंब दिसले नाहीत. भगव्या जातीचे तीन ते चार टन वजनाची सुमारे चार लाख रुपये किमतीची डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले आहे. हे डाळिंब काढणीस आले होते. (A pomegranate worth lakhs of rupees was stolen from a tree in the field)म्हणजे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या संदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा नोंद करण्यात आली आह
सध्या डाळिंब काढणीला आले होते. अतिशय काबाड कष्ट करुन आम्ही हे पिकं पिकवलं होतं. साधरणत: चाट टन डाळिंबाचा माल होता. तो चोरुन नेला आहे. यामध्ये माझे चार लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अमृत पवार यांनी सांगितली. त्यामुळं याप्रकरणी तात्काळ कारवाई करावी अशी माहिती शेतकरी अमृत पावर यांनी सांगितली. या डाळिंबातून कमीम कमी चार लाख रुपये झाले असते त्यामुळं प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असल्याचे शेतकरी म्हणाले. ही सर्व डाळिंबाची बाग काढमीस आली होती. अशा अवस्थेतच चोरट्यांनी डाळिंबाच्या बागेवरील फळे चोरुन नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी अमृत पवार यांनी बसला आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळं आता आरोपींना पोलीस केव्हा पकडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा