जागर न्यूज : पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील आमदार समाधान आवताडे यांनी गावभेटीचा दौरा सुरु केला असतानाच आमदार हजर असतात पण अधिकारी मात्र गैरहजर असतात त्यामुळे आ आवताडे संतापले असून त्यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
आ.समाधान आवताडे यांच्या गाव भेट दौऱ्यामध्ये दोन दिवसात नागरिकांनी विविध खात्याच्या कारभारावर जनतेचा रोष पाहता आज दौय्रात तालुका कृषीअधिकारी,सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल,साहाय्यक निबंधक,गटविकास अधिकारी यांनी दौऱ्यात दांडी मारत अन्य कर्मचाऱ्यांना पाठवल्याचे लक्षात येताच गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना आ आवताडे यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याने खळबळ उडाली.काल फटेवाडी, तळसंगी, मरवडे, कात्राळ, कर्जाळ, कागष्ट, डिकसळ, माळेवाडी, पौट, येळगी, हुलजंती या गावचा गाव भेट दौरा केला. त्यांच्यासमवेत तहसीलदार मदन जाधव, ग्रामीण पाणीपुरवठाचे राजकुमार पांडव बाल विकास अधिकारी जगन्नाथ गारूळे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर ,शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, विजय माने ,शिवाजी पवार, दत्तात्रय गणपाटील, अल्लीभाई इनामदार,सुधाकर मासाळ, सचिन चव्हाण, रावसाहेब फटे, उपस्थित होते.
या दौऱ्यात अनेक प्रमुख अधिकाऱ्यांनी दांडी मारत अन्य कर्मचाऱ्यांना पाठवल्यामुळे प्रश्नसंदर्भात जबाबदार अधिकारीच नसल्यामुळे विचारायचे कोणाला असा प्रश्न नागरिक व आ.आवताडे यांच्यासमोर उभा राहिला.त्यामुळे आ.आवताडे यांनी आक्रमक पवित्रा घेत दांडी बहाद्दर अधिकाय्रा विरोधात वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. आजच्या दौऱ्यात ग्रामस्थांनी जलजीवनमधील पाणीपुरवठा, महावितरण,पुरवठा,पंचायत समिती,जि.प.बांधकाम या खात्याविरोधात अनेक तक्रारी केल्या.बाल विकास अधिकारी जगन्नाथ गारूळे ज्या कुटुंबांमधील 18 वर्षाखालील मुलाची आई किंवा वडील मयत झाले किंवा ते त्या मुलाला सांभाळत नाहीत अशा मुलांचे पालन करणाऱ्या पालनकर्त्याला बालसंगोपनासाठी अनुदान देत आहे.त्यासाठीची कागदपत्रे दिली तरी त्यांना अनुदान सुरू करून देण्यात येईल.
मरवडे येथे मनरेगातून मागणी केलेल्या नवीन विहिरीच्या कामाला गटविकास अधिकारी मंजुरी देत नसल्याची व ग्रामपंचायत दप्तर चोरीला गेल्याची तक्रार केली, कागष्ट येथे जलजीवनच्या योजनेमध्ये वाडी वस्तीचा समावेश करावा व रस्त्याची मागणी करण्यात आली डिकसळ येथे पाण्याच्या हौदात विषारी औषध टाकलेल्या आरोपीला अटक पोलीस तपास करीत नसल्याची तक्रार केली. पौट गावात महिलांनी गावात बेसुमार दारू विक्री सुरू असून प्रपंच उध्वस्त झाले आहेत या दारू विक्रेत्यांची वारंवार पोलिसांकडे तक्रार करून ही पोलीस दखल घेत नाहीत तुम्ही तर दखल घेऊन संसार वाचवा अशी मागणी महिला भगिनींनी केल्यानंतर दारू का बंद होत नाही याचा जाब पोलिसांना विचारत दोन दिवसात या गावातील दारू बंद झाली नाही,तर मला माझ्या पद्धतीने कारवाई करावी लागेल असा इशारा आ आवताडे यांनी पोलिसांना दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा