जागर न्यूज : जागा दिसेल तेथे विनापरवाना डिजिटल बॅनर्स बॅनर्स लावणे भलतेच महागात पडले असून पंढरपूर तालुका पोलिसांनी अशा दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिसली जागा की बॅनर्स लावण्याची अनेकांना सवय असते, एखाद्या गल्लीतल्या कार्यकर्त्याचा वाढदिवस असल्यावर तर सगळा परिसर विद्रूप होतो. गल्लीत कुणी कुत्रे विचारत नसले तरी, भल्या मोठ्या डिजिटलवर हा फार मोठा नेता असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा या इतरांनी द्यायच्या असतात पण अनेक राजकीय व्यक्ती, जे स्वत:ला मोठा पुढारी समजत असतात, ते आपल्याच खर्चाने शहरभर डिजिटल लावतात आणि आपलेच हसे करून घेतात. हे डिजिटल पाहून लोक काय म्हणत आहेत हे त्यांना माहीतही नसते. व्यवसायाचे देखील तसेच आहे. आपला उद्योग व्यवसाय प्रसिद्धीला यावा यासाठी कुठेही आपल्या व्यवसायाचे डिजिटल लावतात. ही जागा खाजगी आहे की सरकारी आहे याच्याशी त्यांना काही देणे घेणे नसते. परवानगीशिवाय डिजिटल लावता येत नाहीत हे माहित असले तरी हा उद्योग सुरूच असतो. पण पंढरपूर तालुका पोलिसांनी आता अशा दहा जणांना चांगलाच दणका दिला आहे.
मोहोळ -पंढरपुर ते धर्मपुरी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ चे काम नोव्हेंबर २०२० पासून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचे वतीने करण्यात सुरू असून सदर राष्ट्रीय महामार्गावर मौजे तुंगत ता. पंढरपूर येथे महामार्गावर निर्माणधीन असलेल्या पुलाचे (VOP) भिंतीवर दि. १०/०६/२०२३ रोजीचे सकाळी १०/०० वा ते रात्रौ ११/०० वाजणेचे दरम्यान "डॉ. बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग तुंगत” अशा नावाचा व त्यावर छ शिवाजी महाराज, गौतम बुध्द, महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज, साहित्यरत्न आण्णाभाउ साठे या महापुरूषांचे फोटो असलेला बॅनर लावण्यात आला होता. सदर बाबीचे अनुशंगाने डॉ. अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग व श्री मिलिद पाटील पोलीस निरीक्षक, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी तातडीने भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
सदरचा पुल हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीत येत असल्याने त्याबाबत संबधित विभागास सुचना करण्यात आल्या असुन सदर भुयारीमार्ग पुलावर लावण्यात आलेले डिजीटल बॅनर हे बेकायदेशीररित्या लावण्यात आले होते. त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या वतीने अनाधिकृतपणे डिजीटल बॅनर लावणारे १) अमर महांकाळ फडतरे, २) दिपक पोपट वनसाळे३) देवानंद नामदेव सावंत ४) बदाशराव महादेव वनसाळे) संदीप पोपट वनसाळे ६) निखील चंद्रकांत वनसाळे ७) अविनाश उत्तरेश्वर वनसाळे ८) राजाराम जालिंदर सावंत ९) स्वप्नील चंद्राकांत वनसाळे १०) वामन रामचंद्र वनसाळे सर्व रा तुंगत ता पंढरपुर या लोकांवर त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील पुलाच्या भिंतीवर "डॉ. बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग तुंगत” अशा वर्णनाचा डिजिटल बोर्ड अथवा बँनर सार्वजनीक रस्त्यावरील पुलाच्या भिंतीला लोखंडी खिळे मारुन नुकसान करुन अनधिकृतपणे कोणतीही परवानगी न घेता शासकीय नियमांचे उल्लघंन करून लावल्यामुळे त्यांचे विरूध्द पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पंढरपुर तालुका पोलीस ठाणे हददीतील नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, कोणत्याही सार्वजनिक मालमत्ता, इमारती, पुल, रस्ते या ठिकाणी कोणीही (Unauthorized digital banners, Pandharpur police action) अनधिकृतपणे डिजिटल बोर्ड, बॅनर, कटआउट, झेंडे, जाहीरात फलक, अथवा रंगाचा वापर करून कोणीही सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण, विरूपण करू नये अन्यथा त्याचेविरूध्द महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम ३ प्रमाणे व प्रचलित अधिनियमाव्दारे कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा