जागर न्यूज : राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आहे पण सत्ता असूनही न्याय मिळत नसल्याची तक्रार शिंदे गटातील पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयातील लाच प्रकरणासंदर्भात शेतकऱ्याकडून महसूल प्रशासनाने केलेल्या पिळनूवणीची संदर्भात दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्याकडे 15 व महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे 54 निवेदन देऊन देखील याची दखल घेतली नसल्याची तक्रार दस्तुर खुद्द शिवसेना जिल्हा उपप्रमुख संजय गेजगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करत सत्ता असून न्यायासाठी झगडावे लागत असल्याचा घरचा आहेर देत १० जूले रोजी आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा दिला. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे आले असता त्यांना शासकीय विश्रामगृहात भेट घेत या मागण्याचे निवेदन देण्यात आले त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात देशातील सर्वात मोठा घोटाळा झाला असून वळण कामात प्रत्यक्ष जमिनीची मोजणी न करता तब्बल १७० कोटी मोबदला बोगस वाटप केलेला आहे,
सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील लक्ष्मीबाई बोधगिरे या जिवंत असताना त्यांना मयत दाखवत यांच्या जमिनीचा मोबदला दुसऱ्यांना वाटप केला.सांगोला येथील ६५६ मधील बहिण भावाचा हिस्सा असताना फक्त भावाच्या वारसांना वाटप केले आहे.बहिणीच्या वारसांनी टक्केवारी न दिल्याने त्यांना मोबदला दिला नाही. जुनोनी गट ५६९ हि जमीन बाधित नसताना त्यांना नोटीसा काढून मोबदला देण्यात आला.वंचित लोकाच्या मोबदल्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली असता तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्या पत्राला चुकीचे व दिशाभूल करणारे उत्तर दिले. मंगळवेड्यातील शारदा भीमराव होवाळे या महिलेचा बाधित होऊनही अद्याप कुठलाही मोबदला मिळाला नाही. कमलापूर येथील जमीन गट क्रमांक 461/१ मध्ये हि जमीन शासनाने भूसंपादन करून 24 लोकांना वाटप केली आहे.
या जमिनीवर इतर व्यक्तीने कब्जा केला असून सदर जमीन वाटपकेल्याप्रमाणे त्या बेघरांना मिळावी.या प्रकरणात ज्या मागणीची चौकशी केली ती चौकशी तपास यंत्रणांनी केली नाही.अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी रास्ता रोको आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून देखील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातले असल्याचे या निवेदनात नमूद केले.
मुख्यमंत्र्यांच्या शिवसेने गटाच्या उपजिल्हाप्रमुखांना न्याय मिळत नसल्याने पुन्हा त्यांच्याकडे न्याय मागण्याची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान या प्रकरणात महसूल विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. लाच प्रकरणातून चर्चेत आलेले मंगळवेढ्याचे प्रांत कार्यालय पुन्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या तक्रारीमुळे पुन्हा चर्चेत आहे त्यातच सत्ता असूनही आणि पालकमंत्री यांना निवेदने देवूनही काही होत नसल्याची तक्रार करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा